एक्स्प्लोर

फँड्री ते बॉलिवूड व्हाया सैराट.. नागराजचा सिनेमासारखा प्रवास

फॅण्ड्रीतून मांडलेली जब्याची गोष्ट असेल किंवा मग आर्ची आणि परशाच्या प्रेमाचा सैराट अंदाज. नागराज जे जगला… जे पाहिलं… जे सोसलं आणि भोगलं तेच या सिनेमातून बाहेर आलं.

मुंबई : नागराज मंजुळे… सिनेमासारखं आयुष्य जगलेला हा माणूस… त्याच आयुष्याची गोष्ट त्याने सिनेमातून मांडली आणि रुपेरी पडद्यावर इतिहास घडवला…

हालगीच्या तालावर वाजत निघालेली सिनेमाची पोस्टर्स आणि त्या वरातीत भान हरपून नाचलेला नागराज. कधी काळी आपल्याही सिनेमाचं पोस्टर एवढ्या दणक्यात झळकेल हे स्वप्नातही त्याने पाहिलं नसेल. 

फॅण्ड्रीतून मांडलेली जब्याची गोष्ट असेल किंवा मग आर्ची आणि परशाच्या प्रेमाचा सैराट अंदाज. नागराज जे जगला… जे पाहिलं… जे सोसलं आणि भोगलं तेच या सिनेमातून बाहेर आलं.

सैराटने बॉक्स अॉफिसवर छप्परतोड कमाई केली आणि नागराज मंजुळे सुपरस्टार झाला. बॉलिवूडकरांना धडकी भरवेल अशी कमाल या सिनेमाने करुन दाखवली. 

हाच नागराज आता बॉलिवूडमध्ये पाऊल टाकतोय. आणि या सिनेमात त्याचा नायक आहे साक्षात अमिताभ बच्चन. 

फेसबुकवर एक पोस्ट शेअर करुन नागराजने लहानपणापासून अमिताभसोबत त्याचं असलेलं नातं स्पष्ट केलय. 

या फेसबुक पोस्टमध्ये नागराज असं म्हणतो की

जेव्हा दिवार सिनेमा पाहिला तेव्हा शर्टला गाठ मारुन शाळेत जायचो. मास्तरांचा मार खायचो पण ती गाठ सुटायची नाही. मित्राची माती वाहण्यासाठी वापरली जाणारी गाढवं गुपचूप पळवायचो आणि शोलेचा खेळ खेळायचो. अर्थात ज्याची गाढवं असायची तोच अमिताभ बनायचा. त्या खेळात सांभाची भूमिका माझ्या वाट्याला यायची पण मी खूश असायचो कारण त्या खेळाचं दिग्दर्शन माझ्याकडे असायचं. 

याराना बघून गल्लीत सगळ्यांना ‘कच्चा पापड पक्का पापड’चा पाढा म्हणायला लावायचो. 

सत्ता, शहेनशाह, लावारिस, कालिया, शराबी अशा कितीतरी सिनेमांच्या गोष्टी सांगून मित्रांचं मनोरंजन करायचो. 

लहानपणापासून जे माझे सगळ्यात आवडते अभिनेते आहेत, ज्यांचे सिनेमे बघत बघत मी मोठा झालो तेच महानायक अमिताभ बच्चन आज माझ्या हिंदी सिनेमाचे मुख्य नायक आहेत. याच्यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट काय असू शकते?

-नागराज मंजुळे

याला जर आपण नशिब किंवा भाग्य म्हणालो तर तो नागराजवर अन्याय ठरेल कारण नागराज नशिब आणि परिस्थितीशी दोन हात करुन इथवर आलाय.

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Pilgaonkar: सचिन पिळगांवकर बनले डॉक्टर, ITM विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट जाहीर; मोठ्या कारकि‍र्दीनंतर विशेष सन्मान
सचिन पिळगांवकर बनले डॉक्टर, ITM विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट जाहीर; मोठ्या कारकि‍र्दीनंतर विशेष सन्मान
Anushka Pimputkar Viral video: तरुणी वृद्ध व्यक्तीच्या जवळ अन्...बसमधील अभिनेत्रीचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, अनुष्का संतापली, म्हणाली 'हे मुद्दाम केलंय'
तरुणी वृद्ध व्यक्तीच्या जवळ अन्...बसमधील अभिनेत्रीचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, अनुष्का संतापली, म्हणाली 'हे मुद्दाम केलंय'
Mitwa Singer Blood Cancer: शाहरुख खानच्या 'मितवा' गाण्याला आवाज देणाऱ्या गायकाला झाला गंभीर आजार, ब्लड कॅन्सरने त्रस्त; स्वत:च दिली हेल्थ अपडेट
शाहरुख खानच्या 'मितवा' गाण्याला आवाज देणाऱ्या गायकाला झाला गंभीर आजार, ब्लड कॅन्सरने त्रस्त; स्वत:च दिली हेल्थ अपडेट
Anubhav Sinhas Father Death: 'Ra.One' सिनेमाच्या दिग्दर्शकावर दु:खाचा डोंगर; वडिलांचे निधन, पोस्ट शेअर करत अनुभव सिन्हांनी सांगितली आठवण
'Ra.One' सिनेमाच्या दिग्दर्शकावर दु:खाचा डोंगर; वडिलांचे निधन, पोस्ट शेअर करत अनुभव सिन्हांनी सांगितली आठवण

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: कारच्या वादातून तरुणाचं अपहरण; हॉटेलमधून जबरदस्तीने नेलं, रिव्हॉल्वरचा धाक दाखवला, बेदम मारहाण अन्..., पुण्यातील थरारक घटना
कारच्या वादातून तरुणाचं अपहरण; हॉटेलमधून जबरदस्तीने नेलं, रिव्हॉल्वरचा धाक दाखवला, बेदम मारहाण अन्..., पुण्यातील थरारक घटना
गोरक्षकाच्या पोस्टमुळे अस्वस्थ महापौरांकडून विषप्राशनचा प्रयत्न, आमदाराचा खळबळजनक दावा; धुळ्यात भाजपचा मोर्चा
गोरक्षकाच्या पोस्टमुळे अस्वस्थ महापौरांकडून विषप्राशनचा प्रयत्न, आमदाराचा खळबळजनक दावा; धुळ्यात भाजपचा मोर्चा
Ambadas Danve: भूदान व ग्रामदानी जमिनींच्या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करा; अंबादास दानवेंची मागणी; मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र धाडलं
भूदान व ग्रामदानी जमिनींच्या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करा; अंबादास दानवेंची मागणी; मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र धाडलं
Sonia Gandhi Home सोनिया गांधींचं आत्मचरित्रपर पुस्तक प्रकाशनानंतर इटलीतील घर चर्चेत; सध्या कुणाच्या मालकीचं, काय आहे तिथं?
सोनिया गांधींचं आत्मचरित्रपर पुस्तक प्रकाशनानंतर इटलीतील घर चर्चेत; सध्या कुणाच्या मालकीचं, काय आहे तिथं?
Pune News: पुण्यात अतिक्रमणांवर बुलडोझर; हाँगकाँग लेन, एफसी रोड, लक्ष्मी रोडनंतर आता औंध-बाणेर-बालेवाडी परिसरात महापालिकेची धडक कारवाई, महापालिका आयुक्तांनी सांगितलं कारवाईचं कारण
पुण्यात अतिक्रमणांवर बुलडोझर; हाँगकाँग लेन, एफसी रोड, लक्ष्मी रोडनंतर आता औंध-बाणेर-बालेवाडी परिसरात महापालिकेची धडक कारवाई, महापालिका आयुक्तांनी सांगितलं कारवाईचं कारण
Pune News: रामवाडी मेट्रो मार्गावर तांत्रिक बिघाड! वनाज ते रामवाडी अन् रामवाडी ते वनाज या दोन्ही दिशांमधील मेट्रो सेवा ठप्प; स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी
रामवाडी मेट्रो मार्गावर तांत्रिक बिघाड! वनाज ते रामवाडी अन् रामवाडी ते वनाज या दोन्ही दिशांमधील मेट्रो सेवा ठप्प; स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी
मी सत्ताधारी नसल्याचे सांगताना नगरसेवकाचं वादग्रस्त वक्तव्य, महापौरांनी बाहेर हाकललं; महापालिकेत राडा
मी सत्ताधारी नसल्याचे सांगताना नगरसेवकाचं वादग्रस्त वक्तव्य, महापौरांनी बाहेर हाकललं; महापालिकेत राडा
FDA Action On Nashik Misal Points: नाशिकच्या नामांकित मिसळ व्यावसायिकांवर FDA ची कारवाई; विहार मिसळ परिसरात शुकशुकाट
नाशिकच्या नामांकित मिसळ व्यावसायिकांवर FDA ची कारवाई; विहार मिसळ परिसरात शुकशुकाट
Embed widget