Unpaused Naya Safar : दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' (Sairat) चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर छाप पाडली. बॉलिवूड (Bollywood) मध्ये या चित्रपटाचा रिमेकही बनला. आता हेच नागराज मंजुळे एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. सैराट चित्रपटामध्ये क्रिकेटच्या सीनमध्ये मंजुळे यांच्या अभिनयाची एक झलक पाहायला मिळाली होती. त्यानंतर आता नागराज मंजुळे अ‍ॅमेझॉन प्राईम (Amazon Prime) वरील आगामी ओटीटीवरील वेब सीरिज (Web Series) मध्ये झळकणार आहेत.


नागराज मंजुळे प्राईमवरील आगामी वेब सीरीज 'अनपॉझ : नया सफर' (Unpaused Naya Safar) मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकताच या वेब सीरिजचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 21 जानेवारीला ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे. ही वेब सीरिज जगभरामध्ये प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये नागराज मंजुळे यांच्यासह अभिनेत्री नीना कुलकर्णी ही झळकणार आहेत. त्याशिवाय साकिब सलीम, श्रेया धन्वंतरी, आणि प्रियांशू पैन्युली या अभिनेत्यांसह नागराज मंजुळे झळकणार आहेत. 'अनपॉझ : नया सफर' वेब सीरिजचा मनोरंजक ट्रेलर प्रदर्शित झाला 1 मिनिट 26 सेकंदांचा हा ट्रेलर खूपच रंजक आहे.


पाहा पूर्ण ट्रेलर




याशिवाय बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर (siddharth roy kapur) आणि नागराज मंजुळे (nagraj manjule) यांची मटका किंग (matka king) ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 1960ते 1990 या दशकतील घटलेल्या सत्य घटनांवर या वेब सीरिजचे कथानक आधारित आहे. रतन खत्रीचं जीवन देखील या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे. अनेक लोक रतन खत्रीला भारतातील मटका म्हणजेच जुगार खेळाचा राजा मानत होते.


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha