Shahrukh Khan On His Kids : आर्यन खान ड्रग्ज केस (Aryan Khan) मुळे शाहरुख खान (Shahrukh Khan) च्या घरी एनसीबीची टीम पोहोचली आहे. अनन्या पांडेचीदेखील एनसीबी आज दिवसभर चौकशी करत होते. दरम्यान, शाहरुख खानचा एक जुना व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. या मुलाखतीत शाहरुखने त्याच्या मुलांसंबंधी वक्तव्य केले आहे. मुलाखती दरम्यान शाहरुखने त्याला वाटत असलेली भीतीदेखील व्यक्त केली आहे. 2008 साली शाहरुख खानने जर्मन टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होतं की, "माझं नाव आणि लोकप्रियता माझ्या मुलांच्या आयुष्यासाठी घातक ठरतयं आणि मला ते कधीच आवडणार नाही".
या मुलाखतीत बोलताना शाहरुख म्हणाला, "मला माझ्या मुलांची जास्त भीती वाटते. ते माझ्या लोकप्रियतेपासून दूर कसे राहतील याचा मी प्रयत्न करतो. मुलांच्या नावाने मला ओळख मिळेल याकडे माझा कल आहे". दरम्यान शाहरुखचा जुना व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. त्यात शाहरुख नाती, दोस्ती आणि मुलांवर भाष्य करताना दिसून येतो आहे.
या व्हिडीओमध्ये शाहरुख खान म्हणतो, "मुलांना जन्म देणे म्हणजे हृदयाचा तुकडा शरीरातून बाहेर येणे". शाहरुख पुढे म्हणतो की, "एखादी महागडी गाडी माझ्या मुलांच्या दिशेने आली तर मला माहित आहे की मी ती थांबवेल". आर्यन खानची सुनावणी 26 ऑक्टोबरला हायकोर्टात होणार आहे.
आर्यन खानच्या न्यायलयीन कोठडीत आणखी वाढ
आर्यन खानच्या न्यायलयीन कोठडीत आणखी वाढ झाली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टानं आर्यन खानसह अन्य सात जणांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर आज आर्यनसह इतर आरोपींना सर्व व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे कोर्टापुढे हजर करण्यात आलं होतं. सुनावणीवेळी न्यायालयानं आर्यनची कोठडी ३० ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे आर्यनचा आणखी दहा दिवस मुक्काम तुरुंगातच राहणार आहे. 14 दिवसांपासून तुरुंगात असणाऱ्या आर्यनला आणखी काही दिवस आर्थर रोडमध्ये राहावं लागणार आहे. मुंबई ड्रग्स प्रकरणी आर्यन खान याचा जामीन अर्ज बुधवारी न्यायालयाने फेटाळला. या निर्णयाला आर्यनच्या वकिलांकडून हायकोर्टात आव्हान दिलं गेलं. यावर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी होणार आहे.