Bunty Aur Babli 2 Teaser Released : सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि राणी मुखर्जी (Rani Mukherjee) चा बंटी और बबली 2 (Bunty Aur Babli 2) सिनेमा प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरल्यामुळे कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनसाठी व्यस्त झाले आहेत. टीझर, ट्रेलर चित्रपटाचाच एक भाग असल्याने त्या छोट्या व्हिडीओमधून चित्रपटाचा अंदाज येत आहे. चित्रपटातील कथानकाचा अंदाज टीझरच्या माध्यमातून प्रेक्षकांना येत आहे. बंटी और बबली 2 चित्रपटाची यूनिक बांधणी पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


टीझरच्या सुरुवातीला राणी मुखर्जी आणि सैफ अली खान शॉटसाठी टचअप करताना दिसून येत आहेत. दोघेही टेक देण्यासाठी जातात तेव्हा सिद्धांत चतुर्वेदी आणि शरवरी वाघ दिसून येतात. सैफ आणि राणी दिग्दर्शकाला विचारतात,"हा कोण आहे?" तेव्हा सिद्धांत आणि शरवरी सांगतात,"यातील एक बंटी आणि एक बबली आहे". त्यानंतर सैफ दिग्दर्शक वरुण सोबत विचारपूस करतो तेव्हा कळतं की आदित्य चोप्राने संहिता बदललेली आहे. त्यामुळे राणी आणि सैफ नाराज होऊन तिथून निघून जातात. 


प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो आहे 'बंटी और बबली 2' चा टीझर


 'बंटी और बबली 2' सिनेमाच्या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. 'बंटी और बबली 2' सिनेमाच्या टीझरसारखा आतापर्यंत एकही टीझर प्रदर्शित झालेला नाही. 19 नोव्हेंबरला सिनेमागृहात  'बंटी और बबली 2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या  'बंटी और बबली' सिनेमात अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जीची जोडी दिसून आली होती. पण आगामी सिनेमात अभिषेकऐवजी सैफ अली खान दिसून येणार आहे. सैफचा अभिनय आणि विनोदबुद्धीमुळे तो या सिनेमाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाणार आहे.


बॉलिवूडमधून दोन चित्रपटांची नावं 'ऑस्कर 2022' साठी शॉर्टलिस्ट


ऑस्कर हा पुरस्कार मनोरंजन क्षेत्रातील महत्वपूर्ण पुरस्कार मानला जातो. ऑस्कर 2022 साठी भारतामध्ये चित्रपटांची निवड प्रक्रिया सुरू केली आहे. बॉलिवूडमधून दोन चित्रपटांची नावं शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. बॉलिवूडमधून विद्या बालनचा शेरनी आणि विकी कौशलचा सरदार उधम सिंह या चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. हे चित्रपट बरेच चर्चेत होते. यामधील विकी कौशलचा सरदार उधम सिंह हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. शेरनी अन् सरदार उधम सिंह हे दोन बॉलिवूडपट ऑस्करसाठी प्रवेशिका म्हणून शॉर्टलिस्ट करण्यात आले आहेत.  आता अनेक जण हे पाहायला उत्सुक आहेत की, या दोन चित्रपटांमपैकी कोणता चित्रपट ऑस्कर पुरस्कार विजेता ठरेल. 


शेरनी 
शेरनी या चित्रपटामध्ये विद्या बालनने प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये विद्या फॉरेस्ट ऑफिसरच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाचे कथानक मानव आणि प्राणी यांच्यावर अधारित आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित झाला होता.   


सरदार उधम सिंह 
सरदार उधम सिंह हा चित्रपट 16 ऑक्टोबर रोजी ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलने प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची निर्मीती शूजीत सरकार यांनी केली आहे. हा चित्रपट सरदार उधम सिंह यांच्या जीवनावर आधारित आहे. सरदार उधम सिंह यांनी इंग्रजांविरोधात लढा दिला होता.  विकी कौशलचा अभिनय आणि चित्रपटाचे कथानक या गोष्टींमुळे हा चित्रपट सध्या चर्चेत आहे.