Munjya Box Office Collection Day 4 : अभिनेत्री शर्वरी वाघ (Sharvari Wagh) अभिनीत 'मुंज्या' (Munjya) हा हॉरर-कॉमेडी चित्रपट सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. 7 जून 2024 रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर रिलीजच्या पहिल्या दिवसापासून सिनेमा धमाकेदार कमाई करत आहे. वीकेंडलाही या चित्रपटाने दमदार कमाई केली आहे.


'मुंज्या' या चित्रपटाची निर्मीती दिनेश विजानने केली आहे. आदित्य सरपोतदारने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'मुंज्या' या चित्रपटात शर्वरी वाघ, मोना सिंह आणि अभय वर्मा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मोठं बजेट आणि स्टारकास्ट नसूनही या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.


'मुंज्या'ची 20 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री (Munjya Box Office Collection Day 4)


सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'मुंज्या'ने 4 कोटी रुपयांची दमदार ओपनिंग केली. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 7.25 कोटींची कमाई केली. तर तिसऱ्या दिवशी रविवारी 8 कोटींचा गल्ला जमवला. रिलीजच्या चौथ्या दिवशी रात्री 11 वाजेपर्यंत चित्रपटाने 3.75 कोटींची कमाई केली आहे. 'मुंज्या'ने रिलीजच्या चार दिवसांत 23 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या चार दिवसांत 'मुंज्या'ने 20 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री देतली आहे. 






जगभरात पडला पैशांचा पाऊस (Munjya Worldwide Collection)


शर्वरी वाघ स्टारर 'मुंज्या' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम परफॉर्म करत आहे. रिलीजच्या तीन दिवसांत 'मुंज्या'ने बॉक्स ऑफिसवर 22.75 कोटी रुपयांची कमाई करत पैशांचा पाऊस पाडला आहे. 30 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. 


'मुंज्या'चं कथानक? (Munjya Story)


'मुंज्या' हा भयपट आहे. एक मुलगा आपल्यापेक्षा सात वर्षांनी मोठी असलेली मुलगी मुन्नीसोबत लग्न करतो. मुलाच्या आईला ही गोष्ट कळल्यानंतर ती त्यांचं लग्न मोडते. पुढे मुन्नी एका वेगळ्या व्यक्तीसोबत लग्न करते. प्रेम न मिळाल्याने मुलगा मात्र वाईट कामे करायला लागतो. पुढे 'मुंज्या'चं निधन होतं. निधनानंतर तो ब्रह्मराक्षस होतो. आता हा चित्रपट किती कोटींचा गल्ला जमवणार हे पाहावे लागेल. 


संबंधित बातम्या


Munjya Movie : ना बिग बजेट, ना तगडी स्टारकास्ट, तरीही बॉक्स ऑफिसवर कशी कमाई करतोय 'मुंज्या'?