Munawwar Faruqui Detained: 'बिग बॉस' 17 (Bigg Boss 17) चा विजेता आणि स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी (Munawwar Faruqui) पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. मुनव्वर पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. मुंबईतील एका हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापेमारी केली. तिथून पोलिसांनी मुनव्वरसह 14 जणांना ताब्यात घेतलं. तसेच त्यांची पोलीस कोठडीत घेऊन चौकशी करण्यात आली. मात्र चौकशी झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला सोडून दिलं. 


मुंबई पोलिसांनी बुधवारी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, 'बिग बॉस 17 चा विजेता मुनव्वर फारुकी आणि 13 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. बुधवार रात्री फोर्ट परिसरातून हुक्का पार्लरवर छापा टाकल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीनंतर सर्व आरोपींना सोडून देण्यात आले.






काय आहे पूर्ण प्रकरण?


दरम्यान पोलिसांनी सांगितलं की, हा जामीनपात्र गुन्हा असला तरी पोलिसांनी नोटीस दिली आहे, त्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याबाबत बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, माहिती मिळाल्यानंतर आमच्या पथकाने मुंबईतील एका हुक्का बारवर छापा टाकला. तेथे आढळलेल्या वस्तूंची तपासणी केल्यानंतर गुन्हा दाखल करून 14 जणांना ताब्यात घेण्यात आले. या लोकांमध्ये फारुकीचाही समावेश होता.


दरम्यान मुनव्वर अशा एखाद्या प्रकरणाचा बळी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2021 मध्ये हिंदू देवतांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली त्याला तुरुंगात टाकण्यात आले होते. इंदूरमधील एका कॅफेमधील कार्यक्रमात भाजपचे काही कार्यकर्ते तिथे आले आणि त्यांना मुनव्वरने हिंदू धर्मातील देवतांची खिल्ली उडवल्याचा आरोप केला. त्यानंतर जवळपास 1 महिना मुनव्वर तुरुंगात होता. त्यामुळे पुन्हा एकदा मुनव्वर वादाच्या भोवऱ्यात अडकला असल्याचं पाहायला मिळतंय. 






ही बातमी वाचा : 


Panchayat Season 3 latest news : 'पंचायत 3' मध्ये येणार मोठा ट्विस्ट, 'फुलेरा'त येणार नवीन सचिवजी, त्रिपाठींजी होणार बदली?