मुंबई : आज (14 जून) दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होत आहे. परंतु, देशातील सर्वात मोठी तपास यंत्रणा म्हणून ओळख असणाऱ्या सीबीआयच्या हातीही काहीच लागलेलं नाही. 


आजच्याच दिवशी 14 जून 2020 रोजी, एका वर्षापूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं आपल्या वांद्रे येथील राहत्या घरी गळ्याला फास लावत आत्महत्या केली होती. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी एजीआर रजिस्टर करत तपास सुरु केला होता. या दरम्यान बिहार पोलिसांनी सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीऱ्याच्या आधारे त्याच्या गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसह तिचं कुटुंब आणि मॅनेजर श्रुती मोदीच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. 


काही दिवसांनी हे प्रकरण बिहार सरकारच्या परवानगीनंतर सीबीआयकडे सोपण्यात आला. मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, एफआयआर जरी सीबीआयकडे असेल आणि तपास सुरु असेल, पण आमच्यावर अद्यापही एडीआरचा तपास सुरु आहे. ज्याला आम्ही अद्याप बंद केला नाही. कारण आम्ही प्रत्येक अँगलनं या प्रकरणी चौकशी करत आहोत. पण अद्याप आम्हाला काहीच संशयास्पद मिळालेलं नाही, ज्याच्या आधारे आम्ही एडीआरला एफआयआरमध्ये कन्वर्ट करता येईल.


मुंबई पोलिसांनी हेदेखील सांगितलं की, जेव्हा हे प्रकरण बिहारहून सीबीआयकडे गेलं त्यावेळी सीबीआयनं आपल्या तपासासाठी वांद्रे पोलीस ठाण्यातील सर्व ओरिजनल दस्तावेज आपल्याकडे घेतले होते. 


सीबीआयचा तपास आतापर्यंत पूर्ण झालेला नाही. त्यामुळेच सीबीआयनं आतापर्यंत ती ओरिजनल कागदपत्र मुंबई पोलिसांना परत केलेली नाहीत. मुंबई पोलीस वाट पाहत आहेत की, सीबीआय त्यांना ती कागदपत्र पूर्ण करेल आणि एकदा कागदपत्र हातात आले की, पोलीस अधिकृतपणे एडीआर अधिकृतरित्या बंद करु शकतील. 


'सुशांत आत्महत्या करूच शकत नाही, वर्ष उलटलं तरी तपास पूर्ण का नाही?' उषा नाडकर्णी यांचा उद्विग्न सवाल


'सुशांत स्वप्न बघणारा मुलगा होता. अवघ्या 23-24 वर्षांचा तो मुलगा मोठी स्वप्न घेऊन आला होता. मालिकांमधून सिनेमामध्ये गेला. तिथेही त्याला चांगले सिनेमे मिळाले. त्याला जे हवं ते सगळं मिळत होतं. शिवाय त्याचे त्यानंतर काय करायचं याचे प्लॅनही होते. असं असणारा सुशांत आत्महत्या करूच शकत नाही. मला खात्रीनं वाटतं त्याला मारलं गेलं असणार.', अशा थेट शब्दांत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी सुशांतबद्दलच्या आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. येत्या 14 जूनला सुशांत जाऊन एक वर्षं होतं आहे. या एक वर्षात त्याच्याबाबत काय काय घडलं यावर खास बोलताना एबीपी माझाशी उषाताई बोलल्या. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


'सुशांत आत्महत्या करूच शकत नाही, वर्ष उलटलं तरी तपास पूर्ण का नाही?' उषा नाडकर्णी यांचा उद्विग्न सवाल