मुंबई : पार्टी असो किंवा रेस्टॉरंट, बॉलिवूड स्टार जिथे जातात, तिथे कॅमेरा त्यांचा पाठलाग करत असतो. असंच काहीसं काल मुंबईतील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये घडलं. शिल्पा शेट्टीला कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या दोन फोटोग्राफर्सना हॉटेलच्या बाऊन्सर्सनी बेदम मारहाण केली.
शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना काही फोटोग्राफर्सनी त्यांचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिल्पा शेट्टीही कॅमेऱ्यासमोर पोज देत होती. पण शिल्पा कारमध्ये बसताच हॉटेलमधून दोन बॉडीगार्ड बाहेर आले आणि फोटोग्राफर्सवर हल्ला केला.
या हल्ल्यात फोटोग्राफर सोनू आणि हिमांशु शिंदे गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला असून बाऊन्सर्स त्यांना बेदम मारहाण करत असल्याचं दिसत आहे.
यानंतर त्यांनी तातडीने 100 नंबरवर पोलिसांना कॉल केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. एक तासानंतर हॉटेल मालकाने कॉल केल्यानतंर पोलिस तिथे दाखल झाले. बऱ्याच वेळाने फोटोग्राफर्सना रुग्णालयात दाखल केलं.
या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोन्ही बाऊन्सर्सना अटक करण्यात आली आहे.
पाहा व्हिडीओ
https://twitter.com/ANI/status/906015193670459394