एक्स्प्लोर

'दंगल'मधील राष्ट्रगीताला उभं न राहिल्याने मुंबईत प्रेक्षकाला चोप

मुंबई : 'दंगल' चित्रपटात राष्ट्रगीताच्या सीनला उभं न राहिल्यामुळे एका प्रेक्षकाला मारहाण झाल्याचं वृत्त आहे. मुंबईतल्या गोरेगावमधील एका चित्रपटगृहात 59 वर्षीय प्रेक्षकाच्या तोंडावर फटकावल्याची माहिती 'मिड डे' या वृत्तपत्राने दिली आहे. अमलराज दासन नावाचा प्रेक्षक गेल्या बुधवारी गोरेगावमधील एका थिएटरला 'दंगल' चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. चित्रपटातील एका सीनमध्ये राष्ट्रगीताची धून वाजते. मात्र या सीनच्या वेळी उभं न राहिल्याने एका प्रेक्षकाने अमलराज यांच्या तोंडावर फटकावल्याचं वृत्त आहे. चित्रपटात अभिनेता आमीर खानने कुस्तीवीर महावीर फोगाट यांची भूमिका साकारली आहे. महावीर यांची कन्या गीता फोगाट कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावते. त्यानंतर तिला पदक बहाल करताना पार्श्वभूमीला भारतीय राष्ट्रगीताची धून वाजते. त्यावेळी उभं न राहिल्याने हा वाद झाला. दरम्यान, आरोपी शिरीष मधुकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कलम 323 ( जाणूनबुजून दुखापत करणे) आणि 504 ( शांततेचा भंग करण्याच्या उद्देशाने मुद्दाम अवमान करणे) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वीही चित्रपटाच्या सुरुवातीला राष्ट्रगीत सुरु असताना उभं न राहिल्याने प्रेक्षकांमध्ये वाद झाल्याची उदाहरणं पाहायला मिळाली आहेत.

चित्रपट सुरु होण्याआधी थिएटरमध्ये राष्ट्रगीत लावा : सर्वोच्च न्यायालय

देशभरातील चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य आहे. चित्रपट सुरु होण्यासाठी थिएटरमध्ये राष्ट्रगीतासह पडद्यावर राष्ट्रध्वज दाखवा, असा आदेशच सर्वोच्च न्यायालयाचा देशभरातील चित्रपटगृहांना दिला आहे. राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभं राहणंही गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. तसंच कोणत्याही परिस्थिती अपूर्ण राष्ट्रगीत लावण्यास परवानगी नसेल, असंही न्यायालयाने नमूद केलं.

थिएटरमध्ये राष्ट्रगीतावेळी अपंगांना उभं राहण्याची सक्ती नाही

अपंगांना राष्ट्रगीताच्या वेळी उभं राहण्यात सूट देण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टानं राष्ट्रगीतावेळी चित्रपटगृहाचे दरवाजे बंद ठेवण्याचाही आदेश दिला आहे. हा आदेश राष्ट्रगीतावेळी शांतता आणि शिस्त राखली जावी यासाठी दिल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं आहे. राष्ट्रगीतावेळी प्रेक्षकांनी चित्रपटगृहातून बाहेर जाऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याचंही कोर्टानं स्पष्ट केलं. मात्र दरवाजा बाहेरुन बंद करण्यास कोर्टानं सांगितलेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar And Kaynaat Dhar Engagement: पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
Aadesh Bandekar on Eknath Shinde: ...नाहीतर मला मंदिरासमोर फासावर द्या; विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आरोप, आता आदेश बांदेकरांचं थेट उत्तर
...नाहीतर मला मंदिरासमोर फासावर द्या; विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आरोप, आता आदेश बांदेकरांचं थेट उत्तर
Mulshi Pattern Actor Om Bhutkar: गुपचूप लग्न, आता पत्नीची चर्चा; 'मुळशी पॅटर्न' फेम ओम भूतकरनं गुपचूप उरकलं लग्न, तिचं नाव काय?
गुपचूप लग्न, आता पत्नीची चर्चा; 'मुळशी पॅटर्न' फेम ओम भूतकरनं गुपचूप उरकलं लग्न, तिचं नाव काय?
Saif Ali Khan: 'तू हा सीन न्यूड होऊन...', 20 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'या' सिनेमासाठी दिग्दर्शकाची अजब मागणी, सैफ अली खान म्हणाला...
'तू हा सीन न्यूड होऊन...', 20 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'या' सिनेमासाठी दिग्दर्शकाची अजब मागणी, सैफ अली खान म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
नोव्हाक जोकोविचचे 25व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये 15 वर्षांनी लहान असणाऱ्या सिनरने बाजी मारली
नोव्हाक जोकोविचचे 25व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये 15 वर्षांनी लहान असणाऱ्या सिनरने बाजी मारली
Panvel Crime News : ग्राहक बनून हॉटेलमध्ये गेले; व्यवहार ठरवला पैसे अन्...; पनवेलमधील नामांकित हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; 6 महिलांची सुटका
ग्राहक बनून हॉटेलमध्ये गेले; व्यवहार ठरवला पैसे अन्...; पनवेलमधील नामांकित हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; 6 महिलांची सुटका
Embed widget