MIFF : 17 वा 'मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' (Mumbai International Film Festival) येत्या 29 मे पासून सुरू होत आहे. हा महोत्सव 29 मे ते 5 जून दरम्यान पार पडणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेक बिग बजेट हिंदी-मराठी सिनेमे प्रदर्शित होत आहेत. अशातच आता चित्रपट महोत्सवालादेखील सुरुवात झाली आहे. कान्स चित्रपट महोत्सवालादेखील सुरुवात झाली आहे. कान्स चित्रपट महोत्सव झाल्यानंतर लगेचच मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे.
17 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ) (MIFF) 29 मे ते 4 जून 2022 या कालावधीत होणार आहे. या साठी 15 फेब्रुवारी पासून प्रवेशिका स्विकारल्या गेल्या होत्या. 1 सप्टेंबर 2019 आणि 31 डिसेंबर 2021 दरम्यान पूर्ण झालेले चित्रपट मिफ्फ महोत्सवामध्ये (MIFF-2022) प्रवेशासाठी पात्र ठरले होते.
सर्वोत्कृष्ट माहितीपटाला मिळणार 'सुवर्ण शंख' आणि 10 लाखाचे रोख पारितोषिक
महोत्सवातील सर्वोत्कृष्ट माहितीपटाला 'सुवर्ण शंख' आणि 10 लाखाचे रोख पारितोषिक मिळणार आहे. तसेच विविध श्रेणीतील विजेत्या चित्रपटांना आकर्षक रोख पारितोषिके, 'रौप्य शंख', ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. या महोत्सवात भारतीय नॉन-फिचर फिल्म विभागातील एका दिग्गज व्यक्तीला प्रतिष्ठित 'व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार' 10 लाख रुपये, ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
देश सध्या 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा करत आहे. त्यामुळेच या महोत्सवात 'इंडियाएटदरेट75' (India@75) या थीमवर आधारित सर्वोत्कृष्ट लघुपटाला विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. जगातील विविध कानाकोपऱ्यातील सिनेप्रेमी या महोत्सवाला हजेरी लावणार आहेत. तसेच दिग्गजांच्या उपस्थितीत हा महोत्सव पार पडणार आहे.
संबंधित बातम्या