Karan Johar : बॉलिवूडचा लोकप्रिय निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता आणि लेखक करण जोहर (Karan Johar) आज त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. करण जोहरने आज खास पार्टीचे आयोजन केले आहे. या पार्टीला अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. करणचे चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. दरम्यान करणने वाढदिवशी त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. करणने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आगामी सिनेमासंदर्भात माहिती दिली आहे. 


करणचा 50 वा वाढदिवस खूपच खास आहे. त्यानिमित्ताने करणने एक मोठी घोषणा करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. करण लवकरच एका सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. करणची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. करणचे चाहते नेहमीच त्याच्या सिनेमाचे आतुरतेने वाट पाहत असतात. करणचे अनेक प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये आहेत. अशाताच त्याने चाहत्यांना आगामी सिनेमासंदर्भात माहिती दिली आहे. 


करण जोहरची पोस्ट काय?


करणने लिहिले आहे, आज माझा 50 वा वाढदिवस आहे. आज मी आयुष्याच्या मध्यात आहे. पण तरीदेखील मी स्वत:ला खूप तरुण समजतो. गेल्या 27 वर्षांपासून मी सिनेसृष्टीत काम करतो आहे. आजपर्यंत मी प्रेक्षकांना चांगले सिनेमे देण्याचं काम केलं आहे. चांगले कथानक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. आजवर दर्जेदार काम केलं आहे. लवकरच मी एका अॅक्शनपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. एप्रिल 2023 मध्ये या सिनेमाच्या शूटिंगला मी सुरुवात करणार आहे. 






करण जोहरचे आगामी सिनेमे


करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा 10 फेब्रुवारी 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात णवीर, आलिया, शबाना आणि जया बच्चन यांच्याशिवाय धर्मेंद्रही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. करण जोहरचा जुग जुग जियो हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. 'जुग जुग जियो' या सिनेमामध्ये कियारा आडवाणी आणि वरुण धवन मुख्य भूमिकेत आहेत. कौटुंबिक नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा विनोदी असणार आहे. 


संबंधित बातम्या


Jug Jug Jeeyo Controversy : गाण्यानंतर आता करण जोहरवर स्क्रिप्ट चोरीचा आरोप; लेखकानं शेअर केलं ट्वीट


Karan Johar's 50th Birthday : करण जोहरचा 50 वा वाढदिवस; DDLJ नं करिअरला सुरूवात, आज कोट्यवधींचा मालक