Box Office Report : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनेक बिग-बजेट हिंदी-मराठी सिनेमे प्रदर्शित होत आहेत. कोरोनामुळे अनेक सिने-निर्माते त्यांच्या सिनेमांच्या रिलीज डेट पुढे ढकलत होते. कोरोनाचा सिनेसृष्टीला चांगलाच फटका बसला होता. पण आता पुन्हा सिनेसृष्टीला सुगीचे दिवस आले आहेत. सध्या 'पावनखिंड' (Pawankhind), 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) आणि 'झुंड' (Jhund) सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 


सरकारने सिनेमागृहे 100 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे सिनेसृष्टीत आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बॉलिवूडसह मराठी सिनेमेदेखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या शौर्य, धैर्य आणि पराक्रमाचा त्रिवेणी संगम असलेल्या 'पावनखिंड' सिनेमाने तिसऱ्या आठवड्यात पदार्पण केले आहे.


नागराज मंजुळेंचा 'झुंड' सिनेमा 4 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्सऑफिसवर उत्तुंग षटकार मारला आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी तब्बल 1.5 कोटींची कमाई केली आहे. बीग बी आणि नागराज मंजुळेंचे सिनेसृष्टीसह चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.





आलिया भट्टच्या बहुचर्चित 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाने जगभरात 108.3 कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. गंगूबाई काठियावाडी' सिनेमातील आलियाचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. विकेण्डला या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. 


संबंधित बातम्या


Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धामुळे थांबले उर्वशी रौतेलाच्या चित्रपटाचे शूटिंग 


Jhund Box Office Collection Day 1: नागराज मंजुळेंच्या 'झुंड'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन, पहिल्याच दिवशी केली ‘इतकी’ कमाई!


आलिया भटच्या Gangubai Kathiawadi ची बॉक्स ऑफिसवर धमाल, 100 कोटी क्लबमध्ये समावेश


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha