Mumbai Indians : आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांच्या 'होम मिनिस्टर' (Home Minister) या कार्यक्रमाचं वीसावं वर्ष सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे. महाराष्ट्रासह (Maharashtra) देशभरात या कार्यक्रमाची चांगलीच क्रेझ आहे. आता झी मराठीच्या (Zee Marathi) या बहुचर्चित कार्यक्रमात मुंबई इंडियन्स टीमचा (Mumbai Indians) टीम डेव्हिड  (Tim David ) झळकणार असल्याची चर्चा आहे.


नेमकं प्रकरण काय?


आयपीएलचा (IPL 2024) नवा मोसम अवघ्या चार दिवसांवर आलेला असताना, दहाही फ्रँचाईझींनी आपापल्या प्रचारमोहिमेचा जणू धडाका सुरू केला आहे. मुंबई इंडियन्सनं तर बर्थ डे बॉय टीम डेव्हिडला (Tim David Birthday) चक्क आदेश भावजींच्या रुपात इन्स्टा रिलवर प्रेझेन्ट केलं. झी मराठीच्या 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाच्या शीर्षकगीताची थीम त्या रिलसाठी वापरण्यात आली आहे.






आदेश बांदेकरांकडूनही खिलाडूवृत्तीने शुभेच्छा (Aadesh Bandekar Wishes Tim David)


मुंबई इंडियन्सकडून खास रिलसाठी दार उघड बये दार उघड... 'टीम भावजी इज हिअर' अशी पोस्ट लिहिण्यात आली आहे. झी मराठीचे ओरिजनल भावजी आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांनी सारी गंमतजंमत खिलाडूवृत्तीनं स्वीकारली. वाह टीम जिंकलीच पाहिजे, धाकटे भावजी या शब्दांमध्ये त्यांनी टीम डेव्हिड आणि मुंबई इंडियन्सला शुभेच्छा दिल्या आहेत.


कोण आहे टीम डेव्हिड? (Who is Tim David)


टीम डेव्हिड हा सिंगापूर-ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. सिंगापूर राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि 20-20 फ्रँचायझी संघासाठी खेळताना तो दिसून आला आहे. टीम डेव्हिडचे वडीलदेखील क्रिकेटमध्ये सक्रिय आहेत. 2019-20 दरम्यान तो सिंगापूरच्या क्रिकेट संघात सहभागी झाला असून पुढे ऑस्ट्रेलियाकडून खेळायला त्याने सुरुवात केली.


डेव्हिडच्या रिलवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव


धाकडे भाऊजी झालेल्या टीम डेव्हिडचं रिल सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे. निळ्या रंगाचा पारंपारिक कुर्ता परिधान केलेल्या डेव्हिडचा नवा लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. आपली मुंबई, मराठी मुंबई, टीम डेव्हिडकर सोन्याची पैठणी घेऊन आलाय, डेव्हिड भाऊजी, तोड फोड टीम भाऊ आला, टीम भाऊ मस्तच, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. येत्या 20 मार्चपासून यंदाच्या आयपीएलची (IPL) सुरुवात होणार आहे.


संबंधित बातम्या


IPL 2024 : रोहितमुळेच वाचलं होतं हार्दिक पांड्याचं करियर, मुंबई दाखवणार होती बाहेरचा रस्ता