Bollywood Expensive Actress :  बॉलीवूडमध्ये (Bollywood) कोट्यावधी रुपयांचं मानधन घेणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत. एका जाहिरातीसाठी देखील काही अभिनेत्री कोट्यावधी रुपये घेतात. अशाच एका अभिनेत्री एका 50 सेकंदाच्या जाहिरातीसाठी 1 नाही 2 नाही तब्बल पाच कोटी रुपये मानधन घेतलं आहे. तसेच या अभिनेत्रीना बॉलीवूडचा किंग खान शाहरुखसोबतही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बरं ही अभिनेत्री ना आलिया (Aalia) आहे ना दीपिका (Deepika). या दोघींपैकी कोणतीही अभिनेत्री (Actress) या यादीमध्ये नाही. 


या अभिनेत्री बॉलीवूडसह दाक्षिणात्या सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. तसेच मागील वर्षी या अभिनेत्रीचा एका सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमातून या अभिनेत्रीने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. ही अभिनेत्री अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मॉडेल म्हणूनही काम करत होती. तिने  'मनास्सिनाकरे' या मल्याळम सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तिचा हा पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला आणि ही साऊथ इंडस्ट्रीतली आघाडीची अभिनेत्री ठरली. 


कोण आहे ती अभिनेत्री?


नयनतारा ही अभिनेत्री भारतातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तसेच ही अभिनेत्री बॉलीवूडच्या आघाडीच्या असेलेल्या आलिया भट्ट, कतरिना कैफ, क्रिती सेनन, दीपिका पादुकोण यांना देखील टक्कर देते. नयनताराने  दिग्दर्शक विग्नेश शिवनशी लग्नगाठ बांधली. तसेच त्या दोघांना जुळी मुलं आहेत. रिपोर्टनुसार नयनतारा एका सिनेमासाठी 11 कोटी रुपये घेते. तिने नुकताच एक बेंचमार्क सेट केला आहे. 


50 सेकंदाच्या जाहिरातीसाठी घेतले 5 कोटी रुपये


नुकतच एका रिपोर्टनुसार, नयनताराने एका 50 सेकंदाच्या जाहिरातीसाठी 5 कोटी रुपयांचे मानधन घेतलं आहे. नयनताराने टाटा स्कायसोबत एक करार केल्याची माहिती समोर आलीये. यानुसार तिने एका 50 सेकंदाच्या जाहिरातीसाठी 50 कोटी रुपयांचं मानधन घेतलं होतं. ही जाहिरात हिंदीसह तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड भाषेतही प्रदर्शित करण्यात आली होती. 


ही बातमी वाचा : 


Swara Bhaskar on BJP : 'त्यांचा खरा चेहरा आता समोर आलाय....', इलेक्टोरल बॉण्डवरुन स्वरा भास्करचं भारत जोडो न्याय यात्रेतून भाजपवर टीकास्त्र