मुंबई : बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोली पुन्हा एकदा वादात सापडला आहे. यावेळी आदित्य पांचोलीविरोधात एका कार मेकॅनिकने मुंबईच्या वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. "आदित्यने माझ्याकडून कार दुरुस्त केली होती. पण दुरुस्तीचे पैसे मागितले असता त्याने जीवे मारण्याची धमकी दिली," असा आरोप कार मेकॅनिकला केला आहे.
आदित्य पांचोलीची कार दुरुस्ती करण्याचं बिल 2 लाख, 82 हजार 158 रुपये झालं होतं. मेकॅनिकने हे पैसे मागितले असता, आदित्यने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. मेकॅनिकच्या दाव्यानुसार, "वेळेत पैसे देईन असं आदित्यने सांगितलं होतं. पण घरी गेल्यानंतर कॉल आणि मेसेज केले, तेव्हा त्याने उत्तर देणं बंद केलं."
कंगनाचे पांचोलीवर आरोप
आदित्य पांचोली आणि वादाचं जवळचं नातं आहे. कंगना राणावतमुळे त्याचं नाव चर्चेत होतं. एका मुलाखतीदरम्यान कंगनाने आदित्यवर अत्याचाराचा आरोप केला होता. शिवाय आपल्याला घरात बंद केल्याचंही म्हटलं आहे. ज्यावेळी कंगना बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करत होती, त्यावेळी ती आदित्य पांचोलीसोबत रिलेशनशिप होती.
पबमधील भांडणानंतर अटक
2015 मध्ये मुंबईतील एका पबमध्ये हाणामारी करण्याच्या आरोपात आदित्य पांचोलीला अटक करण्यात आली होती. मात्र नंतर त्याची जामीनावर सुटक झाली. पबमध्ये हिंदी गाणी लावण्यावरुन आदित्यचा डीजेसोबत वाद झाला होता. यावेळी पांचोलीने बाऊंसरच्या डोक्यात फोनही मारला होता.
अभिनेता आदित्य पांचोलीवर गुन्हा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jan 2019 08:17 AM (IST)
आदित्य पांचोलीची कार दुरुस्ती करण्याचं बिल 2 लाख, 82 हजार 158 रुपये झालं होतं. मेकॅनिकने हे पैसे मागितले असता, आदित्यने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -