एक्स्प्लोर

अनुष्का शर्माला मुंबई महापालिकेकडून क्लीन चिट

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्माला मुंबई महापालिकेने दिलासा दिला आहे. अवैध इलेक्ट्रिक जंक्शन बॉक्स बसवल्या प्रकरणी बीएमसीने अनुष्काला क्लीन चिट दिली आहे. मुंबईतील वर्सोवा भागात असलेल्या बद्रिनाथ टॉवर्समध्ये अनुष्का शर्मा 20 व्या मजल्यावर राहते. अनुष्काने तिच्या फ्लॅटबाहेरील कॉमन पॅसेजमध्ये अवैधरित्या इलेक्ट्रिक जंक्शन बॉक्स बसवल्याची तक्रार शेजाऱ्यांनी एप्रिल महिन्यात महापालिकेकडे केली होती. संबंधित कॉमन पॅसेज अनुष्का शर्माच्या मालकीचा असल्याचं स्थानिक वॉर्ड ऑफिसने तक्रारदाराला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. अनुष्का शर्मा ही सेलिब्रेटी असल्यामुळे तिला झुकतं माप दिल्याचा दावा बत्रा यांनी केला आहे. पालिका अधिकाऱ्यांनी पॅसेजमध्ये परीक्षण केल्यानंतर संबंधित इलेक्ट्रिक बॉक्स अत्यंत आक्षेपार्ह असल्याचं सांगितलं होतं. शर्मा कुटुंबाने हा बॉक्स तात्काळ हटवावा, अशा सूचना पालिका अधिकाऱ्यांनी शर्मांना दिल्या होत्या. मात्र आता तो बॉक्स भिंतीवर लटकवलेला असल्याचं त्याच वॉर्ड ऑफिसने स्पष्ट केलं आहे. कॉमन पॅसेज शर्मा कुटुंबाच्या मालकीचा असल्यामुळे तो बॉक्स त्यांच्या घरातच असल्याप्रमाणे आहे, असंही पुढे पत्रात म्हटलं आहे. सोसायटीचे माजी सेक्रेटरी सुनिल बत्रा यांनी 6 एप्रिलला पत्र लिहून महापालिकेकडे तक्रार केली होती. बद्रिनाथ टॉवरमध्ये सोळावा आणि सतरावा मजला बत्रा यांच्या मालकीचा आहे. शर्मांनी बसवलेल्या इलेक्ट्रॉनिक बॉक्सविरोधात बत्रा यांनी आधी अग्निशमन विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर बत्रांना महापालिकेकडे तक्रार करण्यास सुचवण्यात आलं. बत्रांच्या तक्रारीनंतर महापालिकेने शर्मांना नोटीस बजावली होती. मात्र आपल्यावरील आरोप तथ्यहीन असल्याचा दावा अनुष्काने केला होता. आवश्यक त्या परवानग्या मिळाल्यानंतरच पॅसेजमध्ये इलेक्ट्रिक बॉक्स बसवल्याचा दावा अनुष्काने केला होता.

संबंधित बातम्या :

अनुष्का शर्माला BMC ची नोटीस, शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर कारवाई

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Saurabh Choughule Ajinkya Rahane: अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget