Radhika Merchant Shloka Mehta : देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकताच त्यांचा प्री-वेडिंग कार्यक्रम (Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding) पार पडला आहे. या रॉयल प्री-वेडिंगनंतर संपूर्ण जगाचं लक्ष आता त्यांच्या शाही लग्नसोहळ्याकडे लागलं आहे. अंबानींच्या दोन्ही सुना गडगंज श्रीमंत आहेत. पण राधिका आणि श्लोकामध्ये सर्वाधिक श्रीमंत कोण हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.


अनंतआधी अंबानींचा मोठा मुलगा आकाश अंबानी (Akash Ambani) याचं लग्न चर्चेत आलं होतं. नीता अंबानींनी (Nita Ambani) त्यांच्या पहिल्या सूनेचं श्लोकाचं (Shloka Mehta) धुमधडाक्यात स्वागत केलं होतं. आता दुसऱ्या सूनेच्या (Radhika Merchant) स्वागतासाठी नीता अंबानी सज्ज आहेत. 


राधिका-श्लोकाबद्दल जाणून घ्या... (Radhika Merchant Shloka Mehta Details)


राधिका मर्चेंटची वडील श्रीमंत उद्योगपती आहेत. त्यामुळे लग्नाआधीच ती एका मोठ्या प्रॉपर्टीची मालकीन आहे. तर दुसरीकडे आकाश अंबानीची पत्नी श्लोकादेखील लॅव्हिश आयुष्य जगते. राधिका मर्चेंट एनकोर हेल्थकेअर या कंपनीचे सीईओ वीरेन मर्चेंट आणि शायला मर्चेंट यांची एकूलती एक मुलगी आहे. गुजराती कुटुंबात जन्म झालेल्या राधिकाने मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन शाळेतून शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती न्यूयॉर्कला गेली. यूएसएमधील न्यूयॉर्क विद्यापीठातून तिने राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी मिळवली आहे.


राधिका मर्चेंट कोट्यवधींची मालकीन (Radhika Merchant Net Worth)


राधिका मर्चेंट शिक्षण पूर्ण केल्यानंतर आता कौटुंबिक उद्योग सांभाळत आहे. तसेच वडिलांच्या एनकोर हेल्थकेअर या कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टरमध्येही तिचा समावेश आहे. लक्झरी आयुष्य जगणाऱ्या राधिकाची एकूण संपत्ती 8 ते 10 कोटींच्या आसपास आहे. तर राधिकाच्या वजिलांची संपत्ती 755 कोटींच्या आसपास आहे. वीरेन मर्चेंटदेखील देशातील श्रीमंत उद्योगपतींमध्ये एक आहेत. वीरेन मर्चेंट यांची राधिका एकूलती एक मुलगी असल्याने वडिलांच्या संपत्तीची ती एकटीच वारसदार आहे. आता अंबानी कुटुंबाची सदस्य होताच तिच्या नावावर आणखी संपत्ती जोडली जाणार आहे.


श्लोका मेहता राधिकापेक्षा श्रीमंत? (Shloka Mehta Networth)


मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मोठी सून श्लोका मेहता ही देशातील सर्वात मोठे हिऱ्यांचे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी आहे. श्लोकाला समाजसेवेची आवड आहे. तिने 2015 मध्ये 'कनेक्ट फॉर' नामक सामाजिक संस्था सुरू केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून अनेकदा ती गरजूंच्या मदतीला धावून जाते. धीरूभाई अंबानी शाळेतून श्लोकाने शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ती अमेरिकेत गेली. अमेरिकेतील प्रिंसटन विद्यापीठातून तिने वकिलीचं शिक्षण घेतलं आहे. श्लोका मेहता वडिलांच्या रोजी ब्लू फाऊंडेशनची संस्थापक आहे. ब्लू फाऊंडेशन ही भारतीत सर्वात मोठ्या हिऱ्यांच्या कंपनीमधील एक आहे. Starsunfolded च्या रिपोर्टनुसार, श्लोका मेहताची 2018 मध्ये एकूण संपत्ती 120 कोटींपेक्षा अधिक होती. 


राधिका-श्लोकाच्या संपत्तीपुढे बॉलिवूड अभिनेत्री आसपास नाहीत (Richest Bollywood Actress)


- दीपिका पादुकोण (Deepika Padukone) - 500 कोटी
- प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) - 600 कोटी
- आलिया भट्ट (Alia Bhatt) - 550 कोटी
- करीना कपूर (Kareena Kapoor) - 485 कोटी
- कतरिना कैफ (Katrina Kaif) - 264 कोटी 
- ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) - 800 कोटी
- माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) - 206 कोटी


संबंधित बातम्या


Radhika Merchant : अंबानीच्या सूनेनं भर कार्यक्रमात एकच शब्द किंग खानला वापरला अन् अख्ख्या बॉलिवूडमध्ये चर्चा!