Singham Again : रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) कॉप युनिवर्समधील बहुप्रतिक्षित सिंघम 3 (Singham ) चित्रपट सध्या चर्चेत आहेत. तगडी स्टारकास्ट असलेला सिंघम अगेन (Singham Again) चित्रपटाची सध्या शूटींग सरु आहे. सिंघम अगेन 2011 साली आलेल्या सिंघम फ्रेंचायझीचा तिसरा चित्रपट आहे. 2011 सिंघम रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधील पहिला चित्रपट होता आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. 40 कोटी बजेट असलेल्या या चित्रपटाने जगभरात सुमारे 150 कोटींचा गल्ला जमवला. अजय देवगणने पहिले दोन सिंघम आणि आता सिंघम 3 चित्रपटासाठी किती फी घेतली आहे?


सिंघम 3 ची शूटिंग सुरु


सिंघम 3 मध्ये बाजीरावच्या भूमिकेत पुन्हा एकदा अजय देवगणची दमदार ॲक्टिंग पाहायला मिळणार असून त्याच्यासोबत बेबो करीना कपूरची केमिस्ट्री चाहत्यांना पाहता येणार आहे. त्यासोबतच रणवीर सिंह, अक्षय कुमार, विकी कौशल, टायगर श्रॉफ मल्टीस्टारकास्ट पाहायला मिळेल. सध्या चित्रपटाची शूटींग सुरु आहे. मात्र, चर्चा आहे ती, अजय देवगणच्या मानधनाची. सिंघम अगेनसाठी अभिनेता अजय देवगणने किती फी आकारली आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर जाणून घ्या.


अजय देवगणने सिंघम 3 साठी आकारलं तीन पट मानधन


सिंघम फ्रेंचायझीमुळे अभिनेता अजय देवगणला बाजीराव सिंघम ही नवी ओळख मिळाली आणि रोहित शेट्टीला त्याच्या 'माचो मॅन' पोलीस अधिकारी. सिंघम अगेन चित्रपटातही अजय देवगण मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. बाजीराव सिंघमच्या भूमिकेमध्ये अजय देवगणने चांगला गल्ला जमवला आहे. या तिन्ही चित्रपटांसाठी त्याने घेतलेले मानधन ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.


पहिल्या बाजीरावसाठी घेतली फक्त एवढी फी


रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम फ्रेंचायझीमधील पहिला चित्रपट सिंघम 2011 साली आला होता. या चित्रपटासाठी अजय देवगणने 6 कोटी रुपये मानधन स्वीकारलं होतं, या चित्रपटाचं बजेट 40 कोटी रुपये होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. रोहित शेट्टी स्टाईल ॲक्शन प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली.


सिंघम रिटर्नसाठी अजय देवगणचं मानधन किती?


त्यानंतर रोहित शेट्टीने सिंघमचा सीक्वेल सिंघम रिटर्न आणला. या चित्रपटात अजय देवगण पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला. 2014 मध्ये आलेल्या सिंघम रिटर्न चित्रपटासाठी अजय़ देवगणने 20 कोटी रुपये मानधन घेतलं होतं. या चित्रपटाचं बजेट 70 कोटी रुपये होतं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 250 कोटींचा गल्ला जमवला.


रोहित शेट्टीचं कॉप युनिव्हर्स


मीडिया रिपोर्टनुसार, अजय देवगणने सिंघम रिटर्नसाठी 20 कोटी रुपये फी घेतली होती. यानंतर रोहित शेट्टीने कॉप युनिव्हर्समधील सिम्बा आणि सुर्यवंशी हे दमदार चित्रपटही बनवले. सिम्बा चित्रपटात अजय देवगणची दमदार एन्ट्री पाहायला मिळाली. त्यानंतर सुर्यवंशी चित्रपटात अक्षय कुमारसोबत रणवीर सिंह आणि अजय देवगण यांच्यात दमदार ॲक्शन पाहायला मिळाली. 


आता सिंघम अगेन चित्रपट 15 ऑगस्ट 2024 ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण पु्न्हा एकदा बाजीराव सिंघमच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी 250 कोटी रुपयांचं बजेट असल्याचं बोललं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सिंघम 3 चित्रपटासाठी अजय देवगणने चित्रपटाच्या कमाईचा 20 टक्के हिस्सा घेणार आहे. ही रक्कम सुमारे 50-60 कोटी रुपये आहे.