एक्स्प्लोर
धोनीच्या बायोपिकची बॅटिंग सुरुच, पहिल्या आठवड्यात कमाई...

मुंबई : टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीच्या बायोपिकची बॉक्स ऑफिसवर बॅटिंग सुरु आहे. ‘धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमाने सात दिवसात 94.13 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपट ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ही माहिती दिली. 30 सप्टेंबर रोजी रिलीज झालेल्या सिनेमाने पहिल्या आठवड्यात म्हणजे गुरुवारपर्यंत 94.13 कोटींची कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी जबरदस्त ओपनिंग मिळवणाऱ्या सिनेमाला वीकडेजमध्ये मात्र त्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. दिवस - कमाई (कोटींमध्ये) शुक्र - 21.30 शनि - 20.60 रवि - 24.10 सोम - 8.51 मंगळ - 7.52 बुध - 6.60 गुरु - 5.50 एकूण - 94.13
‘धोनी दी अनटोल्ड स्टोरी’ची चार दिवसातील कमाई
पहिल्याच दिवशी 21.3 कोटींची कमाई करणारा हा या वर्षातील दुसरा सिनेमा आहे. या अगोदर ‘सुलतान’ या सिनेमाने 36 कोटींची कमाई केली आहे. धोनीने शाहरुख खानच्या ‘फॅन’लाही मागे टाकलं आहे. ‘फॅन’ने पहिल्या दिवशी 19 कोटींची कमाई केली होती. ओपनिंग विकेंडला 66 कोटींचा भरभक्कम गल्ला 'धोनी'ने कमवला. दिग्दर्शक नीरज पांडे यांचं दिग्दर्शन आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. अनेक शहरात या सिनेमाचे शो हाऊसफुल सुरु आहेत. या सिनेमातून धोनीच्या आयुष्यातील अनेक किस्सेही समोर आले आहेत. कोणत्याही सुट्ट्या नसताना एवढी कमाई करण्याचा अनोखा विक्रम या सिनेमाच्या नावावर झाला आहे. सिनेमाला चेन्नईमध्ये जबरदस्त ओपनिंग मिळाली. हा सिनेमा सर्व प्रादेशिक भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. त्याचा देखील फायदा झाल्याचं दिसत आहे. देशभरात 30 ऑक्टोबरला जवळपास 3 हजार स्क्रिनवर हा सिनेमा रिलीज झाला आहे.संबंधित बातम्या
'धोनी: दी अनटोल्ड स्टोरी'ची पहिल्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई
धोनीला हेलिकॉप्टर शॉट शिकवणाऱ्या संतोषच्या मृत्यूची दुर्दैवी कहाणी
Before You Go
Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा






















