एक्स्प्लोर
'या' क्रिकेटरची प्रिया वारियर मोठी फॅन
18 वर्षीय प्रिया वारियर सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. पण आता तिला आवडणारा क्रिकेटर कोण याचीही चर्चा सुरु झाली आहे.
मुंबई : प्रिया वारियर ही खऱ्या अर्थाने एका रात्रीत स्टार बनली. तिच्या एक अदा लाखो-करोडो लोकांना घायाळ करुन गेली आहे. मूळची केरळमधील 18 वर्षीय प्रिया सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. पण आता तिला आवडणारा क्रिकेटर कोण याचीही चर्चा सध्या सुरु झाली आहे.
सध्या प्रत्येकाच्या चर्चेचा विषय प्रिया वारियरच्या अदा हाच आहे. फक्त दक्षिण भारतातच नाही तर देशभरात तिचे चाहते झाल्याचे स आता दिसून येत आहे.
आपल्या खास अदांनी लाखो लोकांना घायाळ करणारी प्रिया ही मात्र, क्रिकेटची मोठी चाहती आहे. त्यामुळे एक क्रिकेटरही तिच्या खूपच आवडीचा आहे.
एका न्यूज चॅनलशी बातचीत करताना प्रियाने सांगितलं की, तिला भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी प्रचंड आवडतो. त्यामुळे आता प्रियाच्या या उत्तरावर नेटीझन्स कसं रिअॅक्ट करतात हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.
दरम्यान, प्रियाने एबीपी न्यूजशी बोलताना असंही सांगितलं की, तिला बॉलिवूडची पद्मावती म्हणजेच दीपिका पदुकोणही खूप आवडते आणि तिच्यासोबत काम करण्याची इच्छाही असल्याचं तिने सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement