The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’चे तिकीट दाखवून दुधावर सवलत देणाऱ्या अनिल शर्मा यांना आता धमक्यांचे फोन येत आहेत. अनिल शर्मा यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा पाहणाऱ्या प्रेक्षकांनी चित्रपटाची तिकिटे दाखवल्यास दुधावर 10 रुपयांची सूट दिली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून त्यांना या संदर्भात धमकीचे फोन येत होते. याप्रकरणी शर्मा यांनी पंतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल आहे. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी एनसी नोंदवली असून अधिक तपास करत आहेत.


घाटकोपरस्थित मुंबई दूधसागर डेअरीचे मालक अनिल शर्मा यांनी त्यांच्या दुधाच्या दुकानाबाहेरील बॅनरवर लिहिले आहे की, जो कोणी 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट पाहील आणि तिकीट दाखवेल त्याला गायीच्या दुधावर 20 टक्के सवलत मिळेल. म्हणजेच 44 रुपये लिटरचे दूध 35 रुपये लिटरला मिळणार आहे. 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटासाठी अशी सवलत ठेवण्यामागे दूध व्यापारी अनिल शर्मा यांचा हेतू असा आहे की, लोकांनी अधिकाधिक हा चित्रपट पाहावा. यासाठी ते आपले नुकसान करायलाही तयार आहेत. मात्र, आता यामुळेच त्यांना धमक्यांचे फोन येऊ लागले आहेत.


‘द कश्मीर फाइल्स’ची क्रेझ


अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) आणि मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) स्टारर 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केला आहे. चित्रपट रिलीज होऊन 17 दिवस उलटलेट, तरी बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची क्रेझ कायम आहे. या चित्रपटामुळे लोक थिएटर्सकडे वळत आहेत. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवत चित्रपटाच्या जागतिक बॉक्स ऑफिस कलेक्शनने 250 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.


दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा हा चित्रपट 11 मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अमानुष छळाचे चित्रण करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना भावूक करत आहे. या चित्रपटात पल्लवी जोशी (Pallavi Joshi), दर्शन कुमार (Darshan Kumaar), मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraboty), चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) आणि अनुपम खेर (Anupam Kher) या कलाकारांच्या अभिनयाने रसिकांना अक्षरशः रडवले आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha