Oscars 2022 :   ऑस्कर पुरस्कार 2022 (Oscars Award 2022) सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. या सोहळ्यात एक घटना घडली. अभिनेता हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विल स्मिथनं (Will Smith) ख्रिस रॉक (Chris Rock) च्या कानशिलात लगावली. त्यानंतर विलनं ख्रिसची माफी मागितली. तसेच ख्रिसनं देखील त्याचं मत मांडलं. आता ऑस्कर पुरस्कार समारंभाचे प्रोड्यूसर विल पॅकर यांनी सांगितलं की, कॉमेडियन क्रिस रॉकला विलं कानाखाली मारल्यामुळे त्याला अटक करण्यासाठी पोलीस तयार होते. 


विल पॅकर यांनी सांगितले की, 'पुरस्कार सोहळ्यात ती घटना घडल्यानंतर जेव्हा अधिकारी ख्रिस आणि विलसोबत बोलत होते तेव्हा ते दोघे एकत्र बसले होते.' पुढे ते म्हणाले, 'त्या आधिकाऱ्यांना सांगितलं की, विलला अकट करण्यासाठी आम्ही तयार आहोत.  ख्रिस तुम्ही त्याच्यावर आरोप करू शकता. ते ख्रिसल हा पर्याय देत होते. पण ख्रिसनं विलवर आरोप केला नाही. तो म्हणाला की मी ठिक आहे.' लॉस अँजेलिसमधील पोलिसांनी ख्रिसला विचारले, 'तुम्हाला वाटतं का की आम्ही कोणती कारवाई केली पाहिजे?' ख्रिसनं या प्रश्नाला नाही असं उत्तर दिलं. लॉस अँजेलिसमधील पोलिसांनी रविवारी सांगितले की,'रॉकने  तक्रार दाखल करण्यास नकार दिला होता.'


काय आहे प्रकरण?


विल स्मिथच्या पत्नीबद्दल म्हणजेच जॅडा स्मिथ बद्दल ख्रिस रॉकनं वक्तव्य केलं. त्यामुळे विल स्मिननं ख्रिसला कानाखाली मारली. त्यानंतर विलनं ख्रिसची माफी देखील मागितली. 


विल स्मिथला ऑस्कर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्याला 'किंग रिचर्ड'या चित्रपटासाठी बेस्ट अॅक्टर हा पुरस्कार प्रदान आला आहे. विल स्मिथचा 'किंग रिचर्ड्स' हा चित्रपट 19 नोव्हेंबर 2021 रोजी रिलीज झाला  होता. 


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha