Subhedar Baaplyok Marathi Movie Release On Friday : कोरोनानंतर थंडावलेली मराठी मनोरंजनसृष्टी (Marathi Movies) आता पुन्हा एकदा बहरली आहे. कोरोनानंतर रितेश देशमुखच्या 'वेड' (Ved) या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला. त्यानंतर 30 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये आजही कायम आहे. आता 'सुभेदार' (Subhedar) आणि 'बापल्योक' (Baaplyok) हे सिनेमे प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. 


राज्यातील शेकडो सिनेमागृहांत प्रदर्शित होणार सुभेदार (Subhedar Movie Details)


'सुभेदार' या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता सुरुवात झाली आहे. 'सुभेदार' या ऐतिहासिक सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 'सुभेदार' सिनेमात तान्हाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरील पराक्रम पाहायला मिळणार आहे. सुभेदारांची अभंग स्वामीनिष्ठा, दुर्दम्य आत्मविश्वास आणि त्याला तळपणाऱ्या तलवारीची साथ या सगळ्यांचं दर्शन आपल्याला या चित्रपटातून होणार आहे. 






दिग्पाल लांजेकरने (Digpal Lanjekar) 'सुभेदार' या सिनेमाच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाच्या टीझर, ट्रेलर आणि गाण्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.राज्यातील शेकडो सिनेमागृहांसह,  देशातील महत्त्वाच्या शहरांतून तसेच सहा विविध देशांमध्ये ‘सुभेदार’ हा सिनेमा 25 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमा सोबतच त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याचे पदर कुटुंबाने दिलेली तितकीच मोलाची साथ याचे दर्शन ‘सुभेदार’ सिनेमात होणार आहे.


नागराज मंजुळेच्या 'बापल्योक'ची प्रेक्षकांना उत्सुकता (Baaplyok Movie Details)


'बापल्योक' हा सिनेमा 25 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. नागराज मंजुळे (Nagraj Manjule) या सिनेमाचा प्रस्तुतकर्ता आहे. वडिल आणि मुलगा यांच्यातील नात्याचा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर उलगडत जाणारा अर्थ, नव्याने सांधले जाणारे बंध, याचा सुरेख मेळ ‘बापल्योक’  या सिनेमाच्या माध्यमातून साधला आहे.


'बापल्योक' या सिनेमात वडिलांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे असून त्यांच्या मुलाची भूमिका विठ्ठल काळे यांनी साकारली आहे. ‘बापल्योक’ सिनेमाची कथा विठ्ठल नागनाथ काळे यांची आहे. वडिलांसोबत एक चांगला सिनेमा पाहण्याची इच्छा असेल तर 'बापल्योक' हा सिनेमा नक्की पाहा. 


संबंधित बातम्या


Subhedar : 'सुभेदार' सिनेमाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; रिलीजआधीच 'वेड','बाईपण भारी देवा'ला मागे टाकत केला केला 'हा' रेकॉर्ड