Rakhi Sawant On Adil Khan Durrani Controversy Allegations : बॉलिवूडची 'ड्रामाक्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखीचा पती आदिल खान दुर्रानी (Adil Khan Durrani) गेल्या काही दिवसांपासून तुरुंगात होता. पण तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्याने राखी सावंतवर गंभीर आरोप केले. आता आदिलने राखीच्या आरोपांवर पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे. 


पत्रकार परिषदेत राखी सावंत म्हणाली की,"मी जन्माने हिंदू होते पण आईमुळे ख्रिश्चन धर्मावर माझा विश्वास होता. आदिलसोबत लग्न केल्यानंतर त्याने इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला. मी इस्लाम धर्म स्वीकारा यासाठी अनेकदा आदिलने मारहाणही केली आहे. आदिलने माझी फसवणूक केली आहे. आदिल हा भिकारी असून त्याने माझ्या पैशांचा गैरवापर केला आहे. 






राखी पुढे म्हणाली,"आदिलसोबत लग्न केल्यानंतर आठ महिन्यांत मी गरोदर होते. पण आदिलच्या अफेअरबद्दल कळल्यानंतर मी गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. आदिलने माझे न्यूड व्हिडीओ बनवून लाखो रुपयांना विकले आहेत. आदिलने मला खूप मारहाण केली आहे. त्याने माझा छळ केला आहे". 


आदिलने राखीवर काय आरोप केले होते? (Adil Khan Durrani Allegations On Rakhi Sawant)


आदिल खान राखी सावंतवर आरोप करत म्हणाला होता की,"राखीने मला फसवलं आहे. तिने मला फसवून विवाहबाह्य संबंधनाचा आरोप केला आहे. राखीचा गर्भपात झालेला नाही. काही कारणाने तिचं गर्भाशय काढून टाकलं आहे. त्यामुळे ती कधीही आई होऊ शकत नाही. राखी मला ड्रग्ज देऊन माझे न्यूड व्हिडीओ बनवायची".


कोण आहे आदिल खान दुर्रानी? (Who is Adil Khan Durrani)


आदिल खान दुर्रानी हा राखी सावंतचा दुसरा पती आहे. कर्नाटकात राहणारा आदिल हा उद्योगपती आहे. राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानीचे अनेक म्युझिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ड्रामाक्वीन आणि आदिल खान दुर्रानी दोघेही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दोघांमध्ये नक्की सत्य कोण बोलतय हे जाणून घेण्याची चाहत्यांना उस्तुकता आहे.  


संबंधित बातम्या


Rakhi Sawant : राखी सावंत कधीच आई होऊ शकत नाही : आदिल खान दुर्रानी