Priyanka Chopra Nick Jonas Wished Anil Sharma: 'गदर 2' (Gadar 2)  सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.  हा चित्रपट 500 कोटी क्लबमध्ये प्रवेश करेल, असंही म्हटलं जात आहे.  गदर-2 हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनीही या चित्रपटाचं खूप कौतुक केले आहे. आता प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि तिचा पती निक जोनास (Nick Jonas) यांनीही गदर 2 च्या यशाबद्दल दिग्दर्शक अनिल शर्मा यांचे अभिनंदन केले आहे.


प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास यांनी 'गदर 2'चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांचे चित्रपटाच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. या जोडप्याने त्यांना  पत्र लिहिले आहे आणि फुलांचा एक सुंदर गुच्छही पाठवला आहे. याबाबत स्वतः अनिल शर्मा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.


अनिल शर्मा यांनी प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी पाठवलेल्या पुष्पगुच्छ आणि पत्राचा फोटो ट्विटर वर शेअर केला आहे. पत्रात  लिहिले आहे,"प्रिय अनिल सर, गदर 2 च्या  यशाबद्दल अभिनंदन! पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! खूप प्रेम, प्रियांका आणि निक"   फोटो शेअर करत अनिल शर्मा  यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, 'प्रियांका चोप्रा आणि निक जोनास तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद... हे खरोखर माझ्या हृदयाला स्पर्शून गेले... #Gadar2'







प्रियांकाने अनिल शर्मा दिग्दर्शित 'द हीरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय' या स्पाय थ्रिलर चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याच्यासोबत सनी देओल आणि प्रीती झिंटा मुख्य भूमिकेत होते.


'गदर 2'नं केली कोट्यवधींची कमाई


सकनिल्सच्या रिपोर्टनुसार, गदर 2 चित्रपटामनं 12 व्या दिवशी जवळपास 11 कोटींची कमाई केली आहे, त्यानंतर हा चित्रपट 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. 'गदर 2' हा 2001 मध्ये आलेल्या 'गदर एक प्रेम कथा' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. यामध्ये सनी देओलने तारा सिंहची भूमिका साकारली तर अमिषा पटेलने सकिनाची भूमिका साकारली. 'गदर 2' (Gadar 2) या चित्रपटात तारा सिंह आणि सकिना यांची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे.


संबंधित बातम्या


Sunny Deol : "दूध माँगोगे तो खीर देंगे, कश्मीर माँगोगे तो लाहौर भी छीन लेंगे"; सनी देओलच्या 'माँ तुझे सलाम 2' सिनेमाचं पोस्टर आऊट