एक्स्प्लोर

Review | व्हॉटसअॅप लव्ह : जुनी पुराणी गोष्ट

व्हॉटसअॅपभोवती फिरणारी एक गोष्ट दिग्दर्शकाने मांडली आहे. व्हॉटसअॅप जरी आजचं असलं तरी त्यातली गोष्ट ही जुनी आणि काही प्रमाणात कालबाह्य असल्यामुळे हा चित्रपट खूप आधी यायला हवा होता असं वाटून जातं.

हेमंतकुमार महाले दिग्दर्शित 'व्हॉटसअॅप लव्ह' हा सिनेमा या शुक्रवारी प्रदर्शित होतो आहे. राकेश बापट, अनुजा साठे यांची या सिनेमात मुख्य भूमिका आहे. सिनेमाच्या नावावरून हा चित्रपट तरूण पिढीसाठी किंबहुना त्या पिढीची मानसिकता दर्शवणारा असेल, असं वाटतं. कारण आज आपल्या सर्वांच्या हातात मोबाईल आहे. मोबाईलमध्ये व्हॉटसअॅप नाही असा एकही जण खरंतर सापडणार नाही. याच व्हॉटसअॅपभोवती फिरणारी एक गोष्ट दिग्दर्शकाने मांडली आहे. व्हॉटसअॅप जरी आजचं असलं तरी त्यातली गोष्ट ही जुनी आणि काही प्रमाणात कालबाह्य असल्यामुळे हा चित्रपट खूप आधी यायला हवा होता असं वाटून जातं.

आपल्या सुखी संसारात रमलेल्या आदित्यला एकेदिवशी एका अनोळखी नंबरवरून हाय हॅंडसम असा मेसेज येतो. आदित्य पहिल्यांदा चक्रावतो. काही दिवसांनी तो त्या व्यक्तीशी बोलू लागतो. या व्यक्तीने आपला व्हॉटसअॅप डीपी मोनालीसा ठेवला आहे. आपली खरी ओळख ती व्यक्ती लपवते. आदित्यला मात्र आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकीचा संशय यायला लागतो. पुढे ती व्यक्ती नेमकी कोण असते, त्याचा आदित्याच्या वैवाहिक जीवनावर काय परिणाम होतो? यावर हा चित्रपट बेतला आहे.

चित्रपटाची कथा काहीशी गूढ वाटते. पण त्यातले प्रसंग हे न पटणारे आहेत. सलग एक वर्षभर कोणी एखादा अशा बिनचेहऱ्याच्या व्यक्तीशी बोलत असेल, हे न पटणारं आहे. पूर्वी हे होत असे. पण आताचा युवा सजग झाला आहे. इथे आदित्य तर एका कॉर्पोरेट कंपनीत काम करणारा सुसंस्कृत तरूण मुलगा आहे. उत्तरार्धात तर त्याचं पेंटर असणं. मग त्याने मनाने चित्र काढणं आणि त्यातून ती युवती प्रगट होणं हे सगळंच गमतीदार आहे. त्यानंतर ती युवती त्याला सतत जागोजागी दिसत राहते हेही तितकंच आनाकलनीय. यामुळे चित्रपट जुन्या धाटणीचा वाटू लागतो. एक नक्की याची मांडणी चकचकीत झाली आहे. काही जर्क संकलनात आहेत. यातली गाणी, कव्वाली श्रवणीय वाटू शकली असती, अर्थात जर ती योग्य सीनमध्ये आली असती तर. इथे तो प्रकार खटकतो.

पिक्चरबिक्चरमध्ये या चित्रपटाला मिळताहेत दोन स्टार्स. याची गोष्ट आजच्या काळातली असती तर हा चित्रपट नक्कीच रिलेट झाला असता. आजच्या तरूण पिढीला आपला वाटला असता.

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Comeback: 'हिरो नंबर 1'चा दमदार कमबॅक; गोविंदाने नव्या सिनेमाची केली घोषणा, नवीन अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करणार
'हिरो नंबर 1'चा दमदार कमबॅक; गोविंदाने नव्या सिनेमाची केली घोषणा, नवीन अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करणार
Pyarelals Wife Sunila Sharma Passes Away: प्रसिद्ध ज्येष्ठ बॉलिवूड संगीतकार प्यारेलाल यांच्यावर दु:खाचा डोंगर; पत्नीचं निधन, कुटुंबावर शोककळा
प्रसिद्ध ज्येष्ठ बॉलिवूड संगीतकार प्यारेलाल यांच्यावर दु:खाचा डोंगर; पत्नीचं निधन, कुटुंबावर शोककळा
The India Story Poster: विषारी कीटकनाशकांच्या शेतीविरोधातील लढा; मराठमोळ्या अभिनेत्याच्या सिनेमाची जोरदार चर्चा
विषारी कीटकनाशकांच्या शेतीविरोधातील लढा; मराठमोळ्या अभिनेत्याच्या सिनेमाची जोरदार चर्चा
Nitesh Rane On Aamir Khan 3rd Marrage: आमिर खान लव्ह जिहादचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर; मिस्टर परफेक्शनिस्टच्या तिसऱ्या लग्नावर नितेश राणेंची सडकून टीका
आमिर खान लव्ह जिहादचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर; मिस्टर परफेक्शनिस्टच्या तिसऱ्या लग्नावर नितेश राणेंची सडकून टीका

व्हिडीओ

CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Embed widget