Bollywood Movies Releasing In September 2023 : सिनेप्रेमींसाठी सप्टेंबर (September) महिना खूपच खास असणार आहे. ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळाली. 'गदर 2', 'ओएमजी 2' ,जेलर' या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धमाका केला. आता सप्टेंबर महिन्यातही शाहरुख खानपासून (Shah Rukh Khan) शिल्पा शेट्टीपर्यंत (Shilpa Shetty)अनेक सेलिब्रिटी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. त्यामुळे या महिन्यातही प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.


'जवान' (Jawan) : 


'पठाण' (Pathaan) या सिनेमानंतर पुन्हा एकदा रुपेरी पडदा गाजवण्यासाठी शाहरुख खान (Shah Rukh Khan) सज्ज आहे. 'जवान' (Jawan) या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता सुरुवात झाली आहे. दुबईतील बुर्ज खलीफावर या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला होता. आता प्रेक्षक प्रतीक्षा करत असलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.
कधी रिलीज होणार? 7 सप्टेंबर


2. द ग्रेट इंडियन फॅमिली (The Great Indian Family)


विकी कौशल आणि मानुषी छिल्लर यांचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा सिनेमा 22 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. विजय कृष्ण आचार्य या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. विकी आणि मानुषीसह या सिनेमात मनोज पाहवा, कुमुद मिश्रा, सादिया सिद्दीकी, अलका अमीन, सृष्टी दीक्षित आणि भुवन अरोडा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 
कधी रिलीज होणार? 22 सप्टेंबर


3. सुखी (Sukhee) 


बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा 'सुखी' हा सिनेमा 22 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सोनल जोशीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात कपिला, दिलनाज ईरानी, पवलीन गुजराल, चैतन्य चौधरी आणि अमित साध महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. एका स्त्रीची गोष्ट प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळणार आहे. 
कधी रिलीज होणार? 22 सप्टेंबर


4. द वॅक्सीन वॉर (The Vaccine War)


'द कश्मीर फाईल्स' फेम विवेक अग्निहोत्री यांचा 'द वॅक्सीन वॉर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 28 सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात पल्लवी जोशी मत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. 
कधी रिलीज होणार? 22 सप्टेंबर


5. फुकरे 3 (Fukrey 3)


'फुकरे 3' हा सिनेमा 28 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात वरुण शर्मा, मनजोत सिंह, पंकज त्रिपाठी, अली फजल, पुलकित सम्राट मुख्य भूमिकेत आहेत. 
कधी रिलीज होणार? 28 सप्टेंबर


6. हड्डी (Haddi) 


नवाजुद्दीन सिद्दीकीचा बहुचर्चित 'हड्डी' हा सिनेमा 7 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नवाजुद्दीनसह या सिनेमात इला अरुण, मोहम्मद जीशान अय्यूब, सौरव सचदेवा, श्रीधर दुबे, राजेश कुमार, विपिन शर्मा आणि सहर्ष शुक्ला मुख्य भूमिकेत आहे.
कधी रिलीज होणार? 7 सप्टेंबर


संबंधित बातम्या


OTT Release This Week: सप्टेंबर महिन्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; ओटीटीवर रिलीज होणार 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज