Gadar 2:   अभिनेता सनी देओलने (Sunny Deol) शनिवारी (2 सप्टेंबर) रात्री मुंबईत त्याच्या गदर 2 (Gadar 2) चित्रपटासाठी सक्सेस पार्टीचे आयोजन केले होते. गदर 2 चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाचा सक्सेस सेलिब्रेट करण्यासाठी अनेक कलकारांनी या सक्सेस पार्टीमध्ये हजेरी लावली. 


किंग खान, मिस्टर परफेक्शनिस्ट आणि भाईजान यांनी लावली हजेरी


गदर 2 चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्ये शाहरुख खान, आमिर खान आणि सलमान खान यांनी हजेरी लावली. या पार्टीच्या रेड कार्पेटवर या तिघांनी पोज दिली. शाहरुख खाननं पत्नी गौरी खानसोबत या पार्टीला हजेरी लावली.






शाहरुख खान आणि गौरी खान यांनी गदर 2 चित्रपटाच्या सक्सेस पार्टीसाठी खास लूक केला होता. शाहरुखनं ब्लू टीशर्ट, ग्रे जॅकेट आणि ब्लॅक पँट असा लूक केला होता. तर गौरी ही ब्लॅक अँड व्हाईट जॅकेट आणि ब्लॅक पँट अशा कॅज्युअल लूकमध्ये दिसली. 






 अजय देवगण, काजोल यांनी देखील गदर 2 चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्ये हजेरी लावली होती.






अभिनेता कार्तिक आर्यन, अनन्या पांडे, विकी कौशल, अभिषेक बच्चन,अनुपम खेर, सुनिल शेट्टी हे कलाकार देखील गदर 2 चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्ये उपस्थित होते.


'गदर 2' हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज झाला. अनिल शर्मा (Anil Sharma) यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. या चित्रपटात सनी देओलसोबतच अमिषा पटेल,लव्ह सिन्हा, सिमरित कौर आणि उत्कर्ष शर्मा  या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. 'गदर 2' हा 2001 मध्ये  रिलीज झालेल्या 'गदर एक प्रेम कथा' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. गदर 2 चित्रपटामध्ये सनी देओलने तारा सिंहची भूमिका साकारली तर अमिषा पटेलने सकिनाची भूमिका साकारली.


संबंधित बातम्या


Gadar 2 : सनी देओलचा 'गदर 2' ऑस्करच्या शर्यतीत? दिग्दर्शक अनिल शर्मांनी दिली महत्त्वाची माहिती