Movie Release in December 2023 : प्रत्येक आठवड्याला वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे सिनेमागृहात आणि ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असतात. या सिनेमांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दर महिन्याला आपल्या लाडक्या कलाकारांचे कोणते सिनेमे प्रदर्शित होणार हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. आता वर्षाचा शेवटही धमाकेदार होणार आहे. डिसेंबर (December) महिन्यात अनेक सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. या सिनेमांची सिनेरसिक आतुरतेने वाट पाहत आहेत. एकंदरीतच वर्षाच्या शेवटी प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. डिसेंबरमध्ये रिलीज होणाऱ्या सिनेमांबद्दल जाणून घ्या...


अॅनिमल (Animal)
कधी प्रदर्शित होणार? 1 डिसेंबर


बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbeer Kapoor) सध्या त्याच्या आगामी 'अॅनिमल' (Animal) या सिनेमामुळे चर्चेत आहे. संदीप रेड्डी वांगा यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि बॉबी देओल (Bobby Deol) मुख्य भूमिकेत आहेत. रश्मिकाने या सिनेमात रणबीरच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तर बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत आहे. 


सॅम बहादुर (Sam Bahadur)
कधी प्रदर्शित होणार? 1 डिसेंबर


'सॅम बहादुर' हा सिनेमा 1 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची सिनेरसिकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे.विकी कौशल (Vicky Kaushal) या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम मानेकशॉच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. मेघना गुलजार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात विकीसह नीरज काबी, एडवर्ड सोनेनब्लिक, रिचर्ड भक्ती क्लेन, साकिय अयूब आणि कृष्ण कांत सिंह बुंदेना महत्तावाच्या भूमिकेत आहेत.


डंकी (Dunki)
कधी प्रदर्शित होणार? 22 डिसेंबर


बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या 'डंकी' (Dunki) या सिनेमामुळे चर्चेत आहे. किंग खानचा हा सिनेमा 22 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात शाहरुखसह तापसी पन्नू, विकी कौशल आणि बोमन ईरानी हे कलाकारही झळकणार आहेत. राजकुमार हिरानी यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 


सालार (Salaar)
कधी होणार प्रदर्शित? 22 डिसेंबर


दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा 'सालार' हा सिनेमा 22 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची सिनेरसिक आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन आणि श्रृती हासन या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.


संंबंधित बातम्या


December Release Movies: वर्षाचा शेवट होणार मनोरंजनात्मक! एकाच दिवशी रिलीज होणार 'हे' मराठी चित्रपट