Shubman Gill Bollywood Crush : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND Vs Aus) हा विश्वचषकाचा (World Cup 2023) अंतिम सामना नुकताच पार पडला असून यात टीम इंडियाचा (Team India) पराभव झाला. सध्या टीम इंडियातील सर्वच खेळाडू चर्चेत आहेत. पण क्रिकेटर शुभमन गिल (Shubman Gill) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. टीम इंडियाचा क्रिकेटर शुभमन गिल अनेकदा सारा तेंडुलकरमुळे (Sara Tendulkar) चर्चेत असतो. पण क्रिकेटर मात्र बॉलिवूडच्या एका वेगळ्याच अभिनेत्रीवर फिदा आहे.


शुभमन गिलची खेळी आणि व्यक्तिमत्त्वाचा मोठा चाहतावर्ग आहे. 'वर्ल्डकप 2023'मध्येही त्याने अनेक रेकॉर्ड केले आहेत. शुभमनचा जन्म 8 सप्टेंबर 1999 रोजी पंजाबमध्ये झाला. वडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी शुभमनने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. सोशल मीडियावर शुभमनचा मोठा चाहतावर्ग आहे. चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात. अनेकदा शुभमनचं नाव सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) लेक सारा तेंडुलकरसोबत (Sara Tendulkar) जोडलं गेलं आहे. कॉफी आणि डिनर डेटवर दोघांना अनेकदा स्पॉट करण्यात आलं आहे. तसेच शुभमनच्या फोटो आणि व्हिडीओवर सारा कमेंट करत असते. त्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना सुरुवात झाली. पण अद्याप दोघांनीही यासंदर्भात काहीही जाहीर केलेलं नाही.


'या' अभिनेत्रीमुळे शुभमन गिल चर्चेत


सारा तेंडुलकरसह शुभमन गिलचं नाव बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानसोबत (Sara Ali Khan) जोडलं जात आहे. शुभमन आणि सारा एअरपोर्टवर स्पॉट झाले आणि त्यानंतर चाहत्यांनी त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना सुरुवात केली. पण करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) या कार्यक्रमात सारा अली खानने या रिलेशनच्या चर्चांवर भाष्य केलं. अभिनेत्री म्हणाली,"सारा या नावामुळे गोंधळ झाला आहे. मी ती नव्हे". त्यानंतर पुन्हा शुभमन आणि सारा तेडुंलकर या जोडीच्या चर्चांना सुरुवात झाली. 


शुभमन गिलची क्रश कोण? (Who is Shubman Gill Crush)


न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार, दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीसह बॉलिवूड गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) शुभमन गिलची क्रश आहे. याआधी शुभमनने साराला डेट करत असल्याचे संकेत दिले होते. सोनम बाजवाच्या कार्यक्रमात शुभमनला विचारण्यात आलं होत की, तुझ्यामते बॉलिवूडची सर्वात फिट अभिनेत्री कोण? त्यावेळी क्रिकेटरने साराचं नाव घेतलं होतं. त्यावर सोनमने त्याला विचारलेलं,"तू साराला डेट करतोय का?". त्यावर तो "असू शकतं" असं म्हणाला होता. 


संबंधित बातम्या


Shubman Gill profile : टीम इंडियाचा प्रिन्स, नवं रनमशीन- शुभमन गिल