Mouni Roy Party With Friends: टीव्हीवरील लोकप्रिय 'नागिन' अभिनेत्री मौनी रॉय ( Mouni Roy) सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, मौनी रॉय नवीन वर्षात तिचा प्रियकर सूरज नांबियारसोबत लग्न करू शकते. दरम्यान, मौनी रॉय तिच्या मैत्रिणींसोबत पार्टी करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  




मौनी रॉयचे हे फोटो गोव्यातील आहेत. त्यामध्ये ती तिच्या मैत्रिणींसोबत मस्ती करताना दिसत आहे. हे फोटो तिची मैत्रिण आश्का गोराडियाने शेअर केले आहेत.




बीचवर आशका मौनी रॉयला मिठी मारताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, "अद्भुत महिलांसोबत घालवलेला अद्भुत वेळ. 




आशकाने शेअर केलेल्या फोटोंमधील या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, ज्यामध्ये मौनीच्या सर्व मित्रिणींच्या हातात फलक दिसत आहेत आणि सर्वांनी फक्त काळ्या रंगाचा नाईट गाऊन घातलेला आहे.




सुत्रांच्या माहितीनुसार, मौनी रॉय अनेक वर्षांपासून दुबई स्थित बिझनेसमन सूरज नांबियारला डेट करत आहे आणि दोघेही जानेवारीमध्ये लग्न करणार आहेत.




रिपोर्ट्सनुसार, मौनी रॉय आणि सूरज नांबियार आधी दुबईमध्येच लग्न करण्याचा विचार करत होते पण आता त्यांनी त्यांचा प्लॅन बदलला आहे आणि ते भारतातच भव्य लग्न करण्याचा विचार करत आहेत. 


दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी मौनी रॉय चुलत भावाने एका मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्याने सांगितलं होतं की, मौनी आणि सूरजचे डेस्टिनेशन वेडिंग होणार आहे. हे लग्न दुबई किंवा इटलीमध्ये होणार असून त्यानंतर पश्चिम बंगालच्या कूचबिहार त्यांच्या मूळ जिल्ह्यात रिसेप्शन होणार आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha



महत्वाच्या बातम्या