Sukesh Chandrashekhar, Jacqueline Fernandez : 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात  सुकेश चंद्रशेखर सध्या अटकेत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याचं नाव  (Sukesh ChandraShekhar) बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिससोबत (Jacqueline Fernandez) जोडले जात आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, नुकतीच ईडीच्या अधिकाऱ्यांनी तिहार जेलमध्ये पिंकी इराणी आणि सुकेश चंद्रशेखर यांची भेट घेतली. त्या दोघांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही प्रश्न विचारले आणि त्यांनी सांगितलेली स्टेटमेंट्स त्या अधिकाऱ्यांनी रेकॉर्ड केली आहेत. 
 
अंमलबजावणी संचालनालयच्या अधिकाऱ्यांनी  दिलेल्या माहितीनुसार,  पिंकी इराणीने सुकेश चंद्रशेखरची जॅकलिन फर्नांडिसशी ओळख करून दिली. जॅकलिनसोबत ओळख करून देण्यासाठी  पिंकीने सुकेशकडून मोठी रक्कम घेतली होती. 


जॅकलीनने ईडी अधिकाऱ्यांना सांगितले की, सुकेश चंद्रशेखरने तो सन टीव्हीचे मालक असल्याचे सांगितले होते. तसेच जयललिता कुटुंबाशी त्याचा संबंध असल्याचे ही त्याने सांगितले. दाक्षिणात्य चित्रपटामध्ये काम देण्याचे आश्वासन सुकेशने जॅकलिनला दिले होते, अशी माहिती जॅकलीनने दिली. जॅकलीनने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या मेकअप आर्टिस्टच्या माध्यमातून ती सुकेशच्या संपर्कात आली होती. 


सुकेशला या वर्षाच्या सुरुवातीला थोड्या काळासाठी जामीन मिळाला होता, तेव्हा तो जॅकलिनला भेटला होता. काही दिवसांपूर्वी जॅकलिन आणि सुकेशचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.


सुकेशने जॅकलीनला गिफ्ट म्हणून दिली बरीच महागडी जनावरं 
सुकेश चंद्रशेखर  या उद्योगपतीने एकूण 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचं समोर आलंय. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश आहे आणि ही सगळी माहिती, ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये देण्यात आली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :


The Kapil Sharma Show : 'मुंबईत राहतो आणि मराठी बोलत नाही'; सोनालीनं कपिलला सुनावलं


Movies Release in 2022: ‘लाल सिंह चड्ढा' ते 'आरआरआर'; 2022 मध्ये 'हे' चित्रपट करणार प्रेक्षकांचे मनोरंजन