Nikamma Poster : अभिनेता अभिमन्यू दासानीने (Abhimanyu Dasani) त्याच्या आगामी 'निकम्मा' (Nikamma) सिनेमाचे पोस्टर रिलीज झाले आहे. या सिनेमात अभिमन्यू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शन, विनोद, रोमान्स आणि नाट्य पाहायला मिळणार आहे. हा बिग बजेट सिनेमा असणार आहे. 


अभिमन्यू दासानीने सोशल मीडियावर 'निकम्मा' सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. या सिनेमात अभिमन्यू हंकी हे पात्र साकारणार आहे. मोशन पोस्टरमध्ये त्याच्या पात्राची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मोशन पोस्टरमध्ये अभिमन्यू अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. 


शर्ली सेठिया आणि शिल्पा शेट्टीदेखील या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.  'निकम्मा' सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सब्बीर खान यांनी सांभाळली आहे. सोनी पिक्चर्सने या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमाचा ट्रेलर 17 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मोशन पोस्टरने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.





वासन बालाच्या 'मर्द को दर्द नही होता' या सिनेमाच्या माध्यमातून अभिमन्यू दासानीने सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या सिनेमाने अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत पुरस्कार पटकावले होते. या सिनेमातदेखील प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळाला होता. अभिमन्यूच्या अभिनयाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. आता पुन्हा एकदा त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


17 जून 2022 रोजी सिनेमागृहात होणार प्रदर्शित


'निकम्मा' सिनेमात अभिमन्यू दासानीसोबत शर्ली सेठिया आणि शिल्पा शेट्टी स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. अभिमन्यू हा अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा आहे. तर या सिनेमाच्या माध्यमातून शिल्पा शेट्टी कमबॅक करणार आहे. याआधी शिल्पा 14 वर्षांनंतर 2021 मध्ये 'हंगामा 2'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. पण या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे 'निकम्मा' सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल,अशी शिल्पाला आशा आहे. हा सिनेमा 17 जून 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 


संबंधित बातम्या


Oscars Awards 2023 : अँड द ऑस्कर गोज टू... 2023 च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची तारीख जाहीर


Dharmaveer : एका धगधगत्या अग्निकुंडाची चरित्रगाथा! 'धर्मवीर'ने पहिल्याच दिवशी केली तब्बल 2.5 कोटींची कमाई