Academy Awards 2023 Date : सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा 'ऑस्कर पुरस्कार' (oscars awards) सोहळ्याकडे मनोरंजनसृष्टीसह सिनेप्रेक्षकांचे लक्ष लागले असते. 2022 चा ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला आहे. 2022 मध्ये कोडा सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला होता. आता 2023 च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची तारीख जाहीर झाली आहे. 


13 मार्च 2023 रोजी यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा रंगणार आहे. लॉस एंजेलिसमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात कोण बाजी मारणार याकडे मनोरंजनसृष्टीसह सिनेप्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 


ऑस्करच्या इतिहासात मार्च महिन्यात दुसऱ्यांदा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. 2022 मध्ये 28 मार्चला पहिल्यांदा हा पुरस्कार सोहळा मार्च महिन्यात पार पडला होता. हा पुरस्कार सोहळा कोण होस्ट करणार यासंदर्भात अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. 


2022 मध्ये सिनेप्रेमींना पुरस्कार सोहळ्यात मतदान करता आले होते. चाहते मतदान करून त्यांच्या आवडत्या सिनेमाला 'ऑस्कर पुरस्कार' मिळवून देऊ शकले. 'फॅन फेव्हरेट' असे या पुरस्काराचे नाव होते. सिनेप्रेमींना हे मतदान ट्विटरद्वारे करायचे होते. 


लॉस एंजलिसमध्ये घुमणारे अॅंड ऑस्कर गोज टू.. हे शब्द कानात साठवण्यासाठी अस्सल हॉलिवूडप्रेमी आसूसलेला असतो. तो दिमाखदार सोहळा देखणा असतोच. पण त्याआधी असणारं रेड कारपेटही पाहण्यासारखं असतं. त्या रेड कारपेटवर जगाच्या कानाकोपऱ्यातल्या सिनेरसिकांना वेड लावणारे कलाकार अवतरतात. त्यांची फॅशन आणि त्यांची एक छबी टिपण्यासाठी कॅमेरे सरसावतात आणि त्यानंतर सुरू होतो ऑस्कर्सचा सोहळा. आता हा दिमाखदार पुरस्कार सोहळा 13 मार्च 2023 रोजी पार पडणार आहे.


संबंधित बातम्या


Oscars 2022 : कोडा ते ड्युन; घरबसल्या पाहू शकता 'ऑस्कर' विजेते चित्रपट


Oscars 2022 : ऑस्करच्या शर्यतीतून भारताची 'रायटिंग विथ फायर' बाहेर, भारतीय सिनेप्रेक्षक निराश