Mother's Day 2024 : बॉलिवूड चित्रपटांमध्ये (Bollywood Movies) प्रेम, मैत्री, भांडण, दुश्मनी आणि कौटुंबिक गोष्टी पाहायला मिळतात. या चित्रपटांमध्ये अनेक अभिनेत्रींनी आईच्या भूमिकेला न्याय दिला आहे. जगभरात 12 मे रोजी मातृदिन साजरा केला होता. खऱ्या आयुष्यातच नव्हे तर अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्रींनी आईची भूमिका साकारली आहे. आईच्या भूमिकेच्या माध्यमातून या अभिनेत्री चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. यात नरगिस (Nargis) ते अनुष्का शेट्टीपर्यंत (Anushka Shetty) अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे.


नरगिस (Nargis) : 'मदर इंडिया' हा चित्रपट 1957 मध्ये रिलीज झाला होता. फार कमी लोकांनी हा चित्रपट पाहिला असेल. या चित्रपटात अभिनेत्री नरगिसने सुनील दत्तच्या आईची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या एक वर्षानंतर दोघांनी लग्न केलं. 


रीमा लागू (Reema Lagoo) : बॉलिवूडच्या उत्कृष्ट अभिनेत्रींचा विषय निघला की दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांचा उल्लेख होतोच. 'वास्तव' या चित्रपटात रीमा लागू यांनी संजय दत्तच्या आईची भूमिका साकारली होती. तर 'हम साथ-साथ है' चित्रपटात तिने भाईजान सलमान खानच्या आईची भूमिका साकारली होती. 


शेफाली शाह (Shefali Shah) : अभिनेत्री शेफाली शाहने 'वक्त'मध्ये अमिताभ बच्चनची पत्नी आणि अक्षय कुमारच्या आईची भूमिका साकारली होती. 'वक्त' रिलीज झाला तेव्हा शेफाली शाह 33 वर्षांची होती. तर अक्षय 38 वर्षांचा होता. 


सुप्रिया कर्णिक (Supriya Karnik) : हृतिक रोशन आणि करीन कपूर स्टारर 'यादें' हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेत्री सुप्रिया कर्णिकने हृतिकच्या आईची भूमिका साकारली होती. 


अनुष्का शेट्टी (Anushka Shetty) : बाहुबलीच्या दुसऱ्या भागात अभिनेत्री अनुष्का शेट्टीने प्रभासच्या आईची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे आतापर्यंत दोन भाग प्रदर्शित झाले आहेत. दोन्ही भागांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. 


मातृदिनानिमित्त आईसोबत 'हे' चित्रपट नक्की पाहा (Mother's Day Movies)


1. मॉम - अभिनेत्री श्रीदेवीचा मॉम हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना पाहता येईल.


2. मिमी - कृती सेननचा मिमी हा चित्रपट प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहता येईल.


3. इंग्लिश विंग्लिश - श्रीदेवीचा इंग्लिश विंग्लिश चित्रपट प्रेक्षकांना प्राईम व्हिडीओवर पाहता येईल.


4. बधाई हो - बधाई हो हा विनोदी चित्रपट प्रेक्षकांना डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येईल.


5. निल बट्टे सन्नाटा - निल बट्टे सन्नाटा हा चित्रपट प्रेक्षक प्राईम व्हिडीओवर पाहू शकतात. 


6. डार्लिंग्स - आलिया भट्टचा डार्लिंग्स चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना पाहता येईल. 


संबंधित बातम्या


Mother's Day 2024 : आईपण अनुभवल्याशिवाय आईच्या भूमिका गाजवणाऱ्या नायिका, कशी आहे ऑनस्क्रिन आईची गोष्ट?