Tania Singh Suicide : इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील सनरयजर्स हैदराबादचा (SRH) खेळाडू अभिषेक शर्मा (Abhishek Sharma IPL Cricketer) वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सूरत येथील लोकप्रिय मॉडेल तानिया सिंहने (Model Tania Singh) आत्महत्या करत आयुष्य संपवलं आहे. त्यानंतर स्थानिक पोलीस आयपीएलमधील स्टार खेळाडूची चौकशी करत आहेत. 


नेमकं प्रकरण काय? 


मॉडेल तानिया सिंहने 20 फेब्रुवारी 2024 रोजी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. तानिया गेल्या दोन वर्षांपासून फॅशन डिझायनिंग आणि मॉडेलिंग या क्षेत्रात शिक्षण घेत आहे. मॉडेलच्या निधनाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलीस सध्या यासंदर्भात चौकशी करत आहे. चौकशीदरम्यान तानियाचा फोन चेक करण्यात आला. त्यावेळी आयपीएल स्टार अभिषेक शर्माचा (Abhishek Sharma) शेवटचा फोन आलेला दिसून आला आहे. त्यानंतर अभिषेक शर्मा अडचणीत आला आहे.


मीडिया रिपोर्टनुसार, तानियाच्या कॉल डिटेलमध्ये अनेक गोष्टी दडलेल्या आहेत. आयपीएलचा स्टार खेळाडू अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) त्याला शेवटचा कॉल केला आहे. त्यामुळे पोलीस सध्या अभिषेकची चौकशी करत आहेत. प्रेमप्रकरणामुळे तानियाने आत्महत्या केली असल्याचा पोलिसांना संशय आहे. 






कोण आहे तानिया सिंह? (Who is Tania Singh)


तानिया सिंहने वयाच्या 28 व्या वर्षी आत्महत्या केली आहे. तानिया सूरतमधील एक लोकप्रिय फॅशन डिझायनर आणि मॉडेल आहे. इंस्टाग्रामवर तिने 10,000 पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. इंस्टा बायोमध्ये तिने डिस्क जॉकी, मेकअप आर्टिस्ट आणि मॉडेल असल्याचं लिहिलं आहे. 


तानियाच्या निधनानंतर सूरत पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. IPL मधील स्टार खेळाडू अभिषेक शर्माचं यात नाव समोर आलं आहे. अभिषेक तानिया सिंहच्या संपर्कात असल्याचं समोर आलं आहे. तानिया 20 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री उशीरा घरी पोहोचली होती. त्यानंतर तिने आत्महत्या केली. मॉडेलच्या निधनाने तिच्या चाहत्यांना आता कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.


'असं' आहे अभिषेक शर्माचं करिअर


अभिषेक शर्मा IPL मध्ये सनरायजर्स हैदराबाद टीमचा खेळाडू आहे. ऑलराऊंडर अशी त्याची ओळख आहे. आयपीएलमध्ये त्याने कमाल खेळी खेळली आहे. आयपीएलच्या 47 सामन्यात त्याने 137.38 सरासरीनुसार 893 रन बनवले आहेत. 2022 मध्ये अभिषेकला आयपीएल ऑक्शनमध्ये सनरायजर्स हैदराबादने साडे सहा कोटी रुपयांत विकत घेतले होते. 


संबंधित बातम्या


IPL 2023 : बोल्टपुढे हैदराबादच्या नवाबांची शरणागती, पाहा भन्नाट गोलंदाजीचा व्हिडीओ