PM Modi On Article 370 Movie :  सध्या बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) ही तिच्या आगामी ‘आर्टिकल 370’ या (Article 370 Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे.  तर, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या चित्रपटाचा उल्लेख केला आहे. आपल्या जम्मू दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी या चित्रपटाचा उल्लेख केला. आपल्या सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी चित्रपटाबद्दलही भाष्य केले. 


जम्मू येथील एका सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी भाषणात जम्मू-काश्मीरसाठी असलेले विशेष कलम अनुच्छेद 370 हटवण्याबाबतच्या निर्णयाचा उल्लेख केला. हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी म्हटले. या दरम्यान पंतप्रधानांनी म्हटले की, आता अनुच्छेद 370 वर एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मला माहित नाही हा चित्रपट कसा आहे. मात्र, टीव्हीवर या चित्रपटाबद्दल पाहिले. आता तुमचा जयजयकार होणार असून लोकांना योग्य माहिती मिळेल असे पीएम मोदींनी म्हटले. 


 






अभिनेत्री यामी गौतमने व्यक्त केले आभार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्टिकल 370 चित्रपटाचा उल्लेख केल्यानंतर अभिनेत्री यामी गौतमने पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. पंतप्रधानांनी चित्रपटाबद्दल भाष्य करणे हे आमच्यासाठी बहुमूल्य आहे. त्यांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू असे यामीने म्हटलेय 


 






चित्रपट निर्मात्यांकडून प्रेक्षकांसाठी बंपर ऑफर


'आर्टिकल 370'च्या निर्मात्यांनी रिलीजच्या पहिल्याच दिवशी खास ऑफर लाँच केली आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी तुम्ही 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहू शकता. आदित्य धरने दिग्दर्शित केलेला चित्रपट 23 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. 'आर्टिकल 370'मध्ये यामी गौतम ही एनआयए अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. 


काश्मीरमध्ये रिलीज होणार नाही


संवेदनशील मुद्यावर भाष्य करणाऱ्या 'आर्टिकल 370' या चित्रपटाबद्दल रिलीज आधीच मतमतांतरे व्यक्त केली जात आहेत. यामी गौतमच्या या चित्रपटात जम्मू-काश्मीर राज्यासाठी संविधानातील अनुच्छेद 370 हटवण्याबाबतची गोष्ट दाखवली जाणार आहे. हा चित्रपट काश्मीरमध्ये प्रदर्शित होणार नाही.