एक्स्प्लोर

मेट्रो कारशेड वादात अमिताभ बच्चन यांची उडी, मनसेची तिखट प्रतिक्रिया

मेट्रो कारशेडसाठी आरेतील झाडांच्या कत्तलीला परवानगी मिळाली आहे. परंतु सामान्य नागरिक, अनेक पर्यावरण प्रेमी, राजकारणी आणि सेलिब्रिटींनी या निर्णयाचा विरोध केला आहे.

मुंबई : मुंबई मेट्रो कारशेडसाठी आरे जंगलातील वृक्षतोडीला अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अप्रत्यक्ष समर्थन केल्यानंतर मनसेने कडाडून विरोध केला आहे. मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी कार्टून काढून, 2009 मध्ये मेट्रोला विरोध करणारे अमिताभ बच्चन नवीन सरकार आल्यावर मेट्रोला कसे पाठिंबा देत आहेत, असा सवाल विचारला आहे. तसंच जंगल तोडून घरात झाड लावल्याने जंगल तयार होत नाही, असंही म्हटलं आहे. त्यामुळे हा वाद आणखीन वाढण्याची चिन्हे आहेत. मेट्रो कारशेडसाठी आरेतील झाडांच्या कत्तलीला परवानगी मिळाली आहे. परंतु सामान्य नागरिक, अनेक पर्यावरण प्रेमी, राजकारणी आणि सेलिब्रिटींनी या निर्णयाचा विरोध केला आहे. रस्त्यावर उतरुन आंदोलनं सुरु आहेत. त्यातच या वादात आता अमिताभ बच्चन यांनी उडी घेतली आहे. अमिताभ बच्चन यांनी मेट्रोच्या समर्थनार्थ ट्वीट करुन कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडीला अप्रत्यक्षरित्या समर्थन केलं आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "माझ्या आजारी मित्राने रुग्णालयात जाण्यासाठी गाडीऐवजी मेट्रोचा वापर केला म्हणून तो लवकर पोहोचला. परत आला तेव्हा फारच प्रभावित झाला होता. म्हणाला अतिशय वेगवान, सोयीस्कर आणि सर्वात कार्यक्षम प्रवास. प्रदूषणावर उपाय. जास्त झाडे लावा. मी माझ्या गार्डनमध्ये लावली आहेत, तुम्ही." याचा मनसे नेते अखिल चित्रे यांनी कार्टूनच्या माध्यमातून तीव्र विरोध केला आहे. "2009 ला जुहूला मेट्रो होणार होती, त्यावेळी विरोध करणारे अमिताभ बच्चन नवीन सरकार आल्यावर मेट्रोला कसे पाठिंबा देत आहेत? असा सवाल विचारला आहे. तसंच जंगल तोडून घरात झाड लावल्याने जंगल तयार होत नाही, असंही म्हटलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या दुतोंडी भूमिकेचा विरोध करण्यासाठी हे कार्टून बनवल्याचं चित्रे यांनी सांगितलं. दरम्यान याआधीच शिवसेनेने आरेमधील कारशेडला विरोध केला आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे यांची पुत्र अमित ठाकरे यांनी कारशेडच्या विरोधात भूमिका घेतली आहे. आरेतील कारशेडसाठी वृक्षतोड 30 सप्टेंबरपर्यंत होणार नाही, राज्य सरकारची हायकोर्टात ग्वाही

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoor Eetha: 'ईठा' सिनेमात 'द केरळ स्टोरी 2' फेम अभिनेत्रीची एन्ट्री; श्रद्धा कपूरसोबत नृत्याचा जलवा दाखवणार, कोण आहे ती?
'ईठा' सिनेमात 'द केरळ स्टोरी 2' फेम अभिनेत्रीची एन्ट्री; श्रद्धा कपूरसोबत नृत्याचा जलवा दाखवणार, कोण आहे ती?
Urfi Javed Screenshots: 'हॉट'स्टार उर्फी जावेदनं धर्म बदलला? रिता भारद्वाज असं नाव ठेवलं? अखेर सत्य समोर, स्क्रिनशॉट्स शेअर करत म्हणाली..
'हॉट'स्टार उर्फी जावेदनं धर्म बदलला? रिता भारद्वाज असं नाव ठेवलं? अखेर सत्य समोर, स्क्रिनशॉट्स शेअर करत म्हणाली..
Shreyas Talpade On Shah Rukh Khan: श्रेयस तळपदेला मिळत नव्हतं होम लोन, शाहरुख खानची एक सही अन् बँकेची मंजुरी, फराह खाननंही केलेला फोन
श्रेयस तळपदेला मिळत नव्हतं होम लोन, शाहरुख खानची एक सही अन् बँकेची मंजुरी, फराह खाननंही केलेला फोन
Bollywood Actresses: 'वर्ल्ड सोशल मीडिया डे' विशेष! कुणी फिटनेस तर कुणी फनी रिल्स, सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या 5 अभिनेत्री
'वर्ल्ड सोशल मीडिया डे' विशेष! कुणी फिटनेस तर कुणी फनी रिल्स, सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या 5 अभिनेत्री

व्हिडीओ

Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report
Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Income Tax Rules : तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?
तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | शनिवार
Lohgarh Fort: केतनच्या मृत्यूनंतर लोहगडावर तो स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली; प्रशासनाकडून 'सावधान'तेची सूचना
केतनच्या मृत्यूनंतर लोहगडावर तो स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली; प्रशासनाकडून 'सावधान'तेची सूचना
Eknath Shinde on Uddhav Thackeray: आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट...; सचिन अहिर शिंदे गटात येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर बोचरा वार
आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट...; सचिन अहिर शिंदे गटात येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर बोचरा वार
Embed widget