एक्स्प्लोर

'हिरकणी'ला थिएटर द्या, नाहीतर 'खळखट्याक'; मनसेचा इशारा

मराठी चित्रपटाला चित्रपटगृह मिळावे, यासाठी मनसे चित्रपट सेना पुन्हा एकदा मैदानात उतरली आहे. 'हिरकणी' या मराठी चित्रपटासाठी मनसेच्या चित्रपट सेनेने चित्रपटगृह मालकांना खळखट्याकचा इशारा दिला आहे.

मुंबई : प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी' हा मराठी चित्रपट 24 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर बॉलिवूडचा बिग बजेट चित्रपट 'हाऊसफुल 4' हा 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. 'हाऊसफुल 4' मुळे हिरकणी चित्रपटाला चित्रपटगृह मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे 'हिरकणी' या मराठी चित्रपटाला चित्रपटगृह दिले नाहीत तर काचा फुटणार, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने दिला आहे. मराठी चित्रपटाला चित्रपटगृह मिळावे, यासाठी मनसे चित्रपट सेना पुन्हा एकदा मैदानात उतरली आहे. 'हिरकणी'साठी मनसेच्या चित्रपट सेनेने चित्रपटगृह मालकांना खळखट्याकचा इशारा दिला आहे. 'हिरकणी'ला चित्रपटगृह मिळावे, यासाठी मनसेचे कार्यकर्ते उद्या (23 ऑक्टोबर)चित्रपटगृह मालकांची भेट घेणार आहेत. मराठी चित्रपटाला चित्रपटगृह मिळावी, तो आमचा हक्क आहे, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. मराठी चित्रपटाला स्क्रीन्स मिळाल्या नाहीत तर खळखट्याक होईल, असा इशारा मनसेने दिला आहे. अभिनेता प्रसाद ओक याने 'हिरकणी'चे दिग्दर्शन केले आहे. तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या चित्रपटात हिरकणीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. लेखक आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर याने हिरकणीची कथा कथा-पटकथा लिहिली आहे. 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या हाऊसफुलमध्ये अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, क्रिती सॅनन, पुजा हेगडे, क्रिती खरबंदा, नवाजुद्दीन सिद्दीकी, चंकी पांडे, शरद केळकर, राणा डुगुबट्टी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे बजेट तब्बल 75 कोटी रुपये इतके आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Hema Malini On Her Biopic: ना ईशा देओल, ना आलिया भट्ट; हेमा मालिनी यांच्या बायोपिकमध्ये कोण झळकणार? 1000 कोटींच्या 3 सुपरहिट फिल्म्स देणारी 'ही' लेडी सुपरस्टार
ना ईशा देओल, ना आलिया भट्ट; स्वतःच्या बायोपिकसाठी हेमा मालिनी यांची पसंती बॉलिवूडच्या 'या' लेडी सुपरस्टारला
Marathi Actor Kamlesh Sawant Shares Incident: 'इंडस्ट्रीत आतापर्यंत माझे 70 लाख बुडालेत...'; मराठीसोबत हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्यानं सांगितलं इंडस्ट्रीचं वास्तव
'इंडस्ट्रीत आतापर्यंत माझे 70 लाख बुडालेत...'; मराठीसोबत हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्यानं सांगितलं इंडस्ट्रीचं वास्तव
Bollywood Actor Struggle Life: बॉलिवूडचा 'किंग ऑफ रोमांस', सलमान-शाहरुखपेक्षाही खतरनाक स्वॅग, परवानगीशिवाय रेखाला केलेलं किस, अख्खी इंडस्ट्री हादरलेली
बॉलिवूडचा 'किंग ऑफ रोमांस', सलमान-शाहरुखपेक्षाही खतरनाक स्वॅग, परवानगीशिवाय रेखाला केलेलं किस, अन्...
Govinda Comeback: 'हिरो नंबर 1'चा दमदार कमबॅक; गोविंदाने नव्या सिनेमाची केली घोषणा, नवीन अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करणार
'हिरो नंबर 1'चा दमदार कमबॅक; गोविंदाने नव्या सिनेमाची केली घोषणा, नवीन अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करणार

व्हिडीओ

Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Iran Conflict: अमेरिकेचा सलग तिसऱ्या रात्रीही इराणवर कहर; ड्रोन अन् क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, '...अन्यथा आम्ही अणु ठिकाणही उडवू'
अमेरिकेचा सलग तिसऱ्या रात्रीही इराणवर कहर; ड्रोन अन् क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, '...अन्यथा आम्ही अणु ठिकाणही उडवू'
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
Sunetra Pawar NCP Crisis: सुनेत्रा पवारांच्या निवडीवर आक्षेप घेणाऱ्या नोटीसमागे वेगळाच मास्टरमाईंड? सुनील तटकरे-प्रफुल पटेलांनी....
सुनेत्रा पवारांच्या निवडीवर आक्षेप घेणाऱ्या नोटीसमागे वेगळाच मास्टरमाईंड? सुनील तटकरे-प्रफुल पटेलांनी...
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
Embed widget