Kiran Karmarkar :  अभिनेते किरण करमरकर (Kiran Karmarkar) यांनी नुकत्याच आलेल्या आर्टिकल 370 (Article 370) या चित्रपटात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भूमिका साकारली आहे. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी देखील बरीच पसंती दर्शवली. त्यांचा अमित शाह यांच्या भूमिकेतील लूक बराच चर्चेत आला होता. यामी गौतम स्टारर 'आर्टिकल 370' या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य झांबळे यांनी केले आहे. तर या चित्रपटाची निर्मिती आदित्य धरने केली आहे. यादरम्यान अभिनेते किरण करमरकर यांनी त्यांची इंडस्ट्रीतल्या कामाविषयी कौतुक केलं आहे. 


किरण करमरकर यांनी नुकतच इट्स मज्जा या वेबपोर्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. 1990 पासून किरण करमरकर यांनी त्यांच्या सिनेसृष्टीतल्या प्रवासाला सुरुवात केली. लोकांना फार कौतुक वाटतं की मी 35 वर्ष इंडस्ट्रीत काम केलंय. पण मी अजूनही फार काही केलं नाही, असं मला कायम वाटतं असं किरण यांनी म्हटलं. दरम्यान यावेळी त्यांनी साकारलेल्या अमित शाह यांच्या भूमिकेविषयी देखील भाष्य केलं आहे. 


मी अजूनही फार काही केलंय असं मला वाटत नाही - किरण करमरकर


माझ्या पहिल्या मालिकेचा एपिसोड हा 1990 मध्ये टेलिकास्ट झाला होता. आज 35 वर्ष होतायत मी या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. पण आजही मी फार काही केलंय, असं मला वाटत नाही. त्यामुळे मी जरी 35 वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करतोय तरीही मला मनासारखं काम मिळत नाही, अशी खंत यावेळी अभिनेते किरण करमरकर यांनी व्यक्त केली आहे. 


अमित शाहच्या भूमिकेवर प्रेक्षकांचं प्रेम - किरण करमरकर


मला सुरुवातीला वाटलं की लोकं मला ओळखतील की नाही. पण अनेकांना ती भूमिका आवडली. आजही मी कुठे गेलो की लोकं मला विचारतात की तुम्हीच ना अमित शाह यांची भूमिका साकारली आहे. आज त्यातील डायलॉगचे मीम्स देखील होतात. अनेकांनी मला सांगितली की तुम्ही अमित शाह यांच्यासारखेच दिसतात. पण त्यांच्या आणि माझ्या भाषेत फार फरक आहे. हे मी शूटींगच्यावेळी आमच्या दिग्दर्शकांना देखील सांगितलं. त्यामुळे अमित शाह साकारणं ही माझी जबाबदारी आहे, असंही त्यांनी म्हटलं. 






ही बातमी वाचा : 


Zee Marathi Serial TRP : नव्या मालिकांचं सत्र पण टीआरपीच्या शर्यतीत झी मराठीची झुंज अपयशीच, फक्त 3 मालिकांनाच स्थान