या सीनमुळे सिनेमा सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात अडकू नये, यासाठी दिग्दर्शकाने हा निर्णय घेतला आहे.
सिनेमात अजय आणि इलियाना यांचा लव्ह मेकिंगचा सीन दहा मिनिटांचा आहे. हा सीन चित्रपटाच्या कहाणीनुसार आवश्यक आहे. परंतु मिलन लुथारिया यांनी हा सीन छोटा करण्यात निर्णय घेतला आहे. किसिंग सीन कमी केला आहे.
दिग्दर्शकाला सेंसर बोर्डाच्या कचाट्यात अडकायचं नाही. मिलन लुथारियांना सिनेमासाठी U/A सर्टिफिकेट हवं आहे. त्या सीनमुळे चित्रपटाला A सर्टिफिकेट मिळू शकलं असतं.
सिनेमात अजय आणि इलियानाशिवाय इम्रान हाश्मी, ईशा गुप्ता आणि विद्युत जामवालही आहे. चित्रपटात सनी लियोनीचा स्पेशल डान्स नंबर आहे. सिनेमाचे डॉयलॉग रजत अरोराने लिहिले आहेत.
अजयच्या या सिनेमाची कथा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीच्या काळातील आहे.
या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख तीन वेळा बदलण्यात आली आहे. याआधी 26 जानेवारीला चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण ती बदलून 12 मे करण्यात आली. परंतु आता सिनेमाची रिलीज डेट 1 सप्टेंबर 2017 निश्चित करण्यात आली आहे.
पाहा टीझर