मुंबई : बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिऑनने मुलगी दत्तक घेतली आहे. लातूरमधील 21 महिन्यांची मुलगी सनी लिऑन आणि तिचा पती डॅनिअल वेबर यांनी दत्तक घेतली आहे. निशा असे सनीने दत्तक घेतलेल्या 21 महिन्यांच्या गोंडस मुलीचं नाव आहे.


खरंतर सनी लिऑनने काही दिवसांपूर्वीच निशाला दत्तक घेतले होते. मात्र, याबाबतची घोषणा आता केली, असे हिंदुस्तान टाईम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

सनीने तिच्या या मुलीचं नाव निशा कौर वेबर असं ठेवलं आहे.

दत्तक घेताना पालक मुलांना निवडतात. मात्र, इथे आम्ही निशाला निवडले नसून, तिनेच आम्हाला पालक म्हणून निवडले असल्याचे सनीने सांगितले.



काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत सनी लिऑनला विचारण्यात आले होते की, 'तुझ्या फॅमिलीबाबत तुझे काय प्लॅन आहेत?' यावर उत्तर देताना सनी लिऑनने आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, तिने म्हटलं होतं की, "मी मुलांबाबत विचार करत आहे. मात्र, प्रेग्नंसीची भीती वाटते. त्याचबरोबर सध्या मी कामातही व्यस्त आहे."

मुलगी दत्तक घेऊन सनी लिऑनने अत्यंत कौतुकास्पद पाऊल उचललं आहे.