Matthew Perry : 'फ्रेंड्स' (Friends) या मालिकेत 'चैंडलर' ही भूमिका साकारणारे अभिनेते मॅथ्यू पेरी (Matthew Perry) यांचे निधन झाले आहेत. 'फ्रेंड्स' ही सीरिज संपल्यापासून ते 'फ्रेंड्स रीयूनियन' येईपर्यंत मॅथ्यू इंडस्ट्रीपासून दूर होते. मॅथ्यू पेरी अनेकदा नशेमुळे चर्चेत असतात. पेरीला ड्रग अॅडिक्शनची सवय होती. पण नशामुक्तीसाठी अभिनेत्याने 74 कोटी रुपये खर्च केले आहेत. 


मॅथ्यू पेरी अंमली पदार्थांचं सेवन करत असल्याने सिनेमाच्या शूटिंगपेक्षा अधिक काळ त्याने ट्रीटमेंट सेंटरमध्ये घालवला आहे. 2018 मध्ये त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. त्यावर्षात त्यांना निमोनिया, कोलोन, कोमा आणि पोटाचं दुखणं अशा अनेक आजारांचा सामना केला होता. काही दिवसांसाठी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. 


अभिनेता मॅथ्यू पेरीने नशामुक्तीसाठी 74 कोटी रुपये केलेले खर्च


मॅथ्यू पेरी वयाच्या 14 व्या वर्षी अंमली पदार्थांचं सेवन करायला लागला. सुरुवातीला बियर आणि वाईन प्यायल्यानंतर तो पेन किलर्स खायला लागला. पुढे हेरोइन घ्यायला त्याने सुरुवात केली. पुढे अंमली पदार्थांचं अती प्रमाणात सेवन होत आहे हे लक्षात आल्यानंतर मॅथ्यूने नशामुक्ती करायला सुरुवात केलीय यासाठी त्याने 74 कोटी रुपये खर्च केले आहेत. 


अभिनेता मॅथ्यू पेरीचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळला आहे. मॅथ्यूचा (Matthew Perry Passed Away) मृतदेह घरातील जकुजीमधे बुडालेल्या अवस्थेत आढळला आहे. मात्र मृत्युचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मॅथ्यू पेरीने वयाच्या 54 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. लास वेगास येथील राहत्या घरी अभिनेत्याचा मृतदेह बुडालेल्या अवस्थेत आढळला आहे.


मॅथ्यू पेरी कोण आहे? (Who is Matthew Perry)


मॅथ्यू पेरी हा हॉलिवूडचा (Hollywood Actor) लोकप्रिय अभिनेता आहे. मॅथ्यू पेरीचा जन्म 19 ऑगस्ट 1969 रोजी विलियमस्टाउन येथे झाला. त्याची आई सुजैन मैरी मॉरिसन पत्रकार असून वडील जॉन बेनेट पेरी हेदेखील हॉलिवूडचे अभिनेते होते. पण मॅथ्यू पेरीचे आईवडील विभक्त झाले आहेत. अभिनेत्याच्या आईने पत्रकार कीथ मॉरिसनसोबत दुसरं लग्न केलं आहे.


संबंधित बातम्या


Matthew Perry Passed Away : 'Friends' स्टार अभिनेता मॅथ्यू पेरीचे निधन; राहत्या घरी आढळला मृतदेह