Marathi Rangbhumi Din 2022 : 'मराठी रंगभूमी दिन' (Marathi Rangbhumi Din) नाट्यवर्तुळात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गेल्यावर्षी हा दिवस कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तिसऱ्या घंटेविनाच साजरा झाला. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने रंगकर्मींनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. मराठी रंगभूमी दिनानिमित्त 'एका लग्नाची पुढची गोष्ट' (eka lagnachi pudhchi goshta) ते 'चारचौघी' (Chaarchoughi) अशा अनेक दर्जेदार नाटकांचे प्रयोग रंगणार आहेत. 


मराठी रंगभूमी दिनानिमित्त जाणून घ्या कोणत्या नाट्यगृहात कोणत्या नाटकाचा प्रयोग रंगेल...



  • चारचौघी (रौप्यमहोत्सवी प्रयोग) - प्रबोधनकार ठाकरे (बोरिवली) - रात्री 8.30 वा.

  • एका लग्नाची पुढची गोष्ट - शिवाजी मंदिर (दादर) - दुपारी 3.30 वा. 

  • 38 कृष्ण व्हिला - दीनानाथ नाट्यगृह (पार्ले) - दुपारी 4.15 वा.

  • आवर्त - प्रबोधनकार ठाकरे (बोरिवली) - दुपारी 4.30 वा.

  • दादा एक गुड न्यूज आहे - गडकरी रंगायतन (ठाणे) - दुपारी 4.30 वा.

  • खरं खरं सांग - विष्णुदास भावे (वाशी) - दुपारी 4 वा.

  • मौनराग (शतक महोत्सवी प्रयोग) - शिवाजी मंदिर (दादर) - रात्री 8.30 वा.

  • संज्या छाया - मराठी रंगभूमीदिनी 'संज्या छाया' कोल्हापूरात!


मराठी रंगभूमी दिनाविषयी...


5 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी 'मराठी रंगभूमी दिन' म्हणून साजरा केला जातो. विष्णूदास भावे यांनी 1843 साली 'सीता स्वयंवर' हे पहिले नाटक सांगली येथे रंगभूमीवर सादर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला.  या घटनेचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. 


लवकरच येणार नवी नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला


वेगवेगळ्या धाटणीची नव-नवीन नाटकं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात विजय केंकरेंच्या  ‘यू मस्ट डाय,’ ‘काळी राणी’ व ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या तीन रहस्यप्रधान नाटकांचा समावेश आहे. ‘जाऊ बाई जोरात’च्या दुसऱ्या भागाची तयारी सुरू आहे. . ‘चर्चा तर होणारच,’ ‘करायचं प्रेम तर मनापासून,’ ‘मास्टर माईंड,’ ‘संभ्रम’ यांसारख्या नवीन नाटकांसोबतच ‘ती परी अस्मानीची’ हे बालनाट्यही लवकरच येणार आहे.  ‘संगीत अवघा रंग एक झाला’ हे जुने नाटकही नव्या संचात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


संबंधित बातम्या


Marathi Natak : 'चारचौघी' ते 'दादा एक गुड न्यूज आहे'; वीकेंडला नाट्यरसिकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी