Athiya Shetty Birthday : बॉलिवूडचा सुपरस्टार सुनील शेट्टीची (Suniel Shetty) लेक अथिया शेट्टी (Athiya Shetty) गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नानाच्या चर्चांमुळे चर्चेत आहे. आज अथिया तिचा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. 


अथियाने आठ वर्षांपूर्वी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं असून गेल्या आठ वर्षांत तिने फक्त पाच सिनेमांत काम केलं आहे. तिने तिच्या सिनेसृष्टीतील प्रवासाची सुरुवात 2015 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'हीरो' या सिनेमाच्या माध्यमातून केली. या सिनेमात ती सूरज पांचोळीसोबत (Suraj Pancholi) झळकली होती. पण अथियाचा हा पहिलाच सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. त्यानंतर ती अनिल कपूर (Anil Kapoor) आणि अर्जुन कपूरच्या (Arjun Kapoor) 'मुबारकां' सिनेमात दिसली. 



सर्वच सिनेमे ठरले फ्लॉप!


अथियाचे सर्वच सिनेमे फ्लॉप ठरले आहेत. 'हीरो' आणि 'मुबारकां' नंतर अथिया 'नवाबजादे', 'मोतीचूर चकनाचूर' आणि 'तडप' या सिनेमांत दिसून आली. पण हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडले आहेत. एकही सिनेमा यशस्वी झालेला नसला तरी अथिया खासगी आयुष्यामुळे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहिली आहे.


अथिया शेट्टी लवकरच अडकणार लग्नबंधनात! 


अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. केएल राहुल आणि अथिया मीडियामध्ये एकमेकांबद्दल बोलणे टाळतात, परंतु दोघेही सोशल मीडियाद्वारे एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता ही जोडी लवकरच सात फेरे घेणार आहे.


गेल्या वर्षी अथियाला खास पोस्ट शेअर करत केएल राहुलने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. अथियासोबतचा सुंदर फोटो शेअर करत त्याने लिहिलं होतं,"हॅपी बर्थ डे माय हार्ट". आथिया केएलसोबत अनेक सामन्यांसाठी विदेश दौरा करत असते. त्यामुळे हे दोघे लग्न कधी करणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 


अथिया आणि के. एल. राहुल हे 2019 पासून एकमेकांना डेट करत आहेत. अथियाची मैत्रीण अनुष्का रंजन हीने या दोघांसोबतचा थायलंड व्हेकेशनचा फोटो तीन वर्षापूर्वी शेअर केला, तेव्हापासूनच अथिया आणि राहुल यांच्या रिलेशनशिपची चर्चा आहे.


संबंधित बातम्या


Athiya Shetty Birthday : सुनील शेट्टीची लाडकी लेक आथियाचा आज वाढदिवस, केएल राहुलकडून प्रेमाची कबुली देत भन्नाट शुभेच्छा