Marathi Movies: आगामी मराठी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. वेगवेगळे चित्रपट चित्रपटगृहामध्ये रिलीज होत असतात. नोव्हेंबर महिना हा सिनेप्रेमींसाठी खास असणार आहे. कारण नोव्हेंबर महिन्यात काही मराठी चित्रपट (Marathi Movies) थिएटरमध्ये रिलीज होणार आहेत. जाणून घेऊयात नोव्हेंबर महिन्यात रिलीज होणाऱ्या चित्रपटांबद्दल...


शॉर्ट अँड स्टीट- 3 नोव्हेंबर 



शॉर्ट अँड स्टीट हा नात्यांवर भाष्य करणारा चित्रपट 3 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, रसिका सुनिल, हर्षद अतकरी, श्रीधर वाटसर हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 


"रंगीले फंटर"(Rangiley Funter) - 3 नोव्हेंबर 


"रंगीले फंटर" हा चित्रपट देखील 3 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.  या चित्रपटात काही मित्रांची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. हंसराज जगताप, रुपेश बने,यश कुलकर्णी, जीवन कऱ्हाळकर, मिलिंद शिंदे, किशोर चौघुले, अभिनेत्री सिया पाटील, डॅनी अडसूळ, वैशाली दाभाडे, अरूण गीते या कलाकारांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.


'श्यामची आई' (Shyamchi Aai)-10 नोव्हेंबर 



'श्यामची आई'  (Shyamchi Aai) हा चित्रपट 10 नोव्हेंबर  रोजी रिलीज होत आहे. या चित्रपटात अभिनेता ओम भूतकरनं (Om Bhutkar) साने गुरुजींची भूमिका साकारली आहे.ओम भूतकरसोबतच गौरी देशपांडे, बाल कलाकार शर्व गाडगीळ,संदीप पाठक, ज्योती चांदेकर, सारंग साठ्ये,उर्मिला जगताप,अक्षया गुरव, दिशा काटकर,मयूर मोरे,गंधार जोशी , अनिकेत सागवेकर या कलाकारांनी  देखील 'श्यामची आई' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.


'नाळ - भाग 2' (Naal Bhag 2)- 10 नोव्हेंबर 


'नाळ - भाग 2' हा चित्रपट 10 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.  'नाळ' (Naal) हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज झाला होता.  आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


'झिम्मा-2' (Jhimma 2)  24 नोव्हेंबर 


 'झिम्मा-2' हा चित्रपट 24 नोव्हेंबर  रोजी रिलीज होणार आहे.सिद्धार्थ चांदेकर, अभिनेत्री सुहास जोशी, निर्मिती सावंत,क्षिती जोग,सुचित्रा बांदेकर,सयाली संजीव, रिंकू राजगुरु आणि शिवानी सुर्वे हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 


 'एकदा येऊन तर बघा' (Ekda Yeun Tar Bagha)


'एकदा येऊन तर बघा' हा चित्रपट  24 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.वनिता खरात, पंढरीनाथ कांबळे, भाऊ कदम आणि  सायाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, प्रसाद खांडेकर,नम्रता संभेराव, तेजस्विनी पंडित,ओंकार भोजने आणि विशाखा सुभेदार या कलाकारांनी 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:


Jhimma 2: 'आम्ही या चित्रपटाची वाट बघत आहोत पण रिंकू राजगुरु..."; झिम्मा-2 चित्रपटाबाबत नेटकऱ्यानं केली कमेंट; सिद्धार्थ रिप्लाय देत म्हणाला...