Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Mumbai-Pune Expressway : भक्ती बर्वे, आनंद अभ्यंकर ते अक्षय पेंडसे; मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर मराठमोळ्या कलाकारांचा झालाय अपघाती मृत्यू


Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर (Mumbai-Pune Expressway) दररोज अपघात होत असतात. या अपघातात अनेकांचा जागीच मृत्यू होतो. मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अनेक कलाकारांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. यात अभिनेत्री भक्ती बर्वे (Bhakti Barve), आनंद अभ्यंकर (Anand Abhyankar) आणि अक्षय पेंडसे (Akshay Pendse) या कलाकारांचा समावेश आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Pune : अभिषेकी बुवांच्या स्मृतीदिनीच 'मत्स्यगंधा'चा प्रयोग रद्द; गोंगाटामुळे नाटकावर पडदा


Pune : पुण्यात अभिषेकी बुवांच्या (Abhisheki Bua) स्मृतीदिनीच 'संगीत मत्स्यगंधा' (Sangeet Matsyagandha) या अजरामर नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला आहे. शेजारील कार्यक्रमाच्या आवाजाच्या दणदणाटामुळे नाटकावर पडदा पडला आहे. 'डीजे' स्पीकरचा संगीत नाटकाला फटका बसला आहे. आवाजाच्या दणदणाटामुळे 'मत्स्यगंधा'चा प्रयोग रद्द करण्यात आला आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Gaurav More : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' स्टार ते फिल्टर पाड्याचा बच्चन; गौरव मोरेचा फिल्मी प्रवास...


Gaurav More : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनोदवीर गौरव मोरे (Gaurav More) घराघरांत पोहोचला आहे. 'फिल्टर पाड्याचा बच्चन' म्हणून तो ओळखला जातो. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Nana Patekar : नाना पाटेकरांच्या 'Journey'चं शूटिंग सुरू;'Gadar 2'च्या दिग्दर्शकासोबतचा फोटो व्हायरल


Nana Patekar Movie Journey Shooting : सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) यांच्या 'गदर 2' (Gadar 2) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालता असून आजही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 500 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. 'गदर 2'च्या यशानंतर या सिनेमाचे दिग्दर्शक अनिल शर्मा (Anil Sharma) यांनी त्यांच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या सिनेमात मराठमोळे अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. नानांनी या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Boyz 4 : 'बॉईज 4'ची दिवाळी स्पेशल ऑफर; फक्त 99 रुपयांत पाहा चित्रपट


Boyz 4 : 'बॉईज 4' (Boyz 4) हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक सिनेमागृहात या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. 'बॉईज 4' हा सिनेमा सिनेरसिकांना फक्त 99 रुपयांत पाहता येणार आहे. सिनेमा जास्तीत जास्त प्रेक्षकांनी पाहावा यासाठी ही ऑफर ठेवण्यात आली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा