Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर (Mumbai-Pune Expressway) दररोज अपघात होत असतात. या अपघातात अनेकांचा जागीच मृत्यू होतो. मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अनेक कलाकारांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. यात अभिनेत्री भक्ती बर्वे (Bhakti Barve), आनंद अभ्यंकर (Anand Abhyankar) आणि अक्षय पेंडसे (Akshay Pendse) या कलाकारांचा समावेश आहे.


भक्ती बर्वे (Bhakti Barve)
अपघात कधी झाला? 12 फेब्रुवारी 2001


भक्ती बर्वे (Bhakti Barve) या मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. बालकलाकार म्हणून त्यांनी अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. भक्ती बर्वे यांचं 'ती फुलराणी' हे नाटक चांगलच गाजलं. या नाटकाचे 1111 पेक्षा अधिक प्रयोग पार पडले आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर निवेदिका म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. भक्ती बर्वे यांचेही मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघातात निधन झाले आहे. वाईहून मुंबईत येत असताना त्यांचा अपघात झाला होता. 12 फेब्रुवारी 2001 रोजी भक्ती बर्वे यांचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघात झाला होता. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टी हादरली होती. 


आनंद अभ्यंकर (Anand Abhyankar)
अक्षय पेंडसे (Akshay Pendse)
अपघात कधी झाला? 23 डिसेंबर 2012


अभिनेते आनंद अभ्यंकर (Anand Abhyankar) आणि अक्षय पेंडसे (Akshay Pendse) हे मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. 23 डिसेंबर 2012 रोजी आनंद आणि अक्षय 'कोकणस्थ' या सिनेमांचं शूटिंग संपवून पुण्याहून मुंबईला येत असताना मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर त्यांचा अपघात झाला होता. भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने त्यांच्या मारुती व्हॅगनारला धडक दिली होती. या धडकेमुळे त्यांचा जागीच दुर्गैवी मृत्यू झाला होता. या अपघातामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. मनोरंजनसृष्टीने दोन चांगले कलाकार गमावले होते. आनंद आणि अक्षय यांच्यासह अक्षयच्या दोन वर्षाच्या मुलाचा प्रत्युषचाही मृत्यू झाला होता. या अपघातामुळे संपूर्ण कलाविश्व हादरलं होतं.


'या' कारणाने होतो मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघात (Mumbai-Pune Expressway Accident Reason)


मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नेहमीच अपघात होत असतो. या महामार्गावरील अपघातात सर्वसामान्यांसह अनेक दिग्गजांना आपला जीव जमवावा लागला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वेगवेगळ्या कारणांनी अपघात होत असतो. एक्सप्रेसवेवर अनियंत्रित उतार आहे. अनेक टोकदार वळणे आहेत. तसेच निष्काळजीपणामुळेही अनेकदा या एक्सप्रेसवेवर अपघात होत असतो. अद्याप यावर उपाययोजना करण्यात आलेली नाही. अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जड वाहतूक, ओव्हरलोड वाहतूक, रस्त्याच्या कडेला होणारे वाहनांचे पार्किंग तसेच वाटेत पडणारी वाहने, घाटात वाहने चालविणारे अकुशल चालक, अती जास्त वेगात वाहन चालविणे अशी अपघाताची विविध कारणे आहेत. 


संबंधित बातम्या


Mumbai Pune Expressway : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पुढील दहा दिवस ब्लॉक, टप्प्याटप्प्याने घेण्यात येणारा 'ब्लॉक' असा असणार