Nana Patekar Movie Journey Shooting : सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) यांच्या 'गदर 2' (Gadar 2) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालता असून आजही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 500 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. 'गदर 2'च्या यशानंतर या सिनेमाचे दिग्दर्शक अनिल शर्मा (Anil Sharma) यांनी त्यांच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या सिनेमात मराठमोळे अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. नानांनी या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.


नानांच्या 'जर्नी'च्या शूटिंगला सुरुवात


नाना पाटेकरांचा 'जर्नी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात नानांसह, उत्कर्ष शर्मादेखील (Utkarsh Sharma) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत शूटिंगला सुरुवात झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.






'जर्नी' हा सिनेमा मुलगा आणि वडिलांच्या नात्यावर आधारित आहे. या सिनेमात वडिल-मुलाचं नातं दाखवण्यात आलं आहे. 2024 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. नानांच्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 'जर्नी' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये नानांसोहत उत्कर्ष शर्मादेखील दिसत आहे.


'ओले ओले'मध्ये झळकणार नाना पाटेकर


नाना पाटेकर यांचा 'ओले ओले' हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 5 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतचं या सिनेमाचं एक पोस्टर आऊट झालं आहे. या सिनेमात नानांसह सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव हे कलाकारही झळकणार आहेत. 


'ओले आले' सिनेमाच्या मोशन पोस्टरसोबत कॅप्शनमध्ये लिहिलेली 'एक अशा प्रवासाची गोष्ट, ज्याने शिकवले जीवन जगण्याचे सूत्र!' ही ओळ आणखी कुतूहल निर्माण करणारी आहे. हे त्रिकुट कुठे चालले आहे? या प्रवासाचं नेमकं प्रयोजन काय बरं असेल? असे बरेच प्रश्न उत्सुकता निर्माण करत आहेत. नानांच्या या दोन्ही सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Nana Patekar : नाना पाटेकरांनी नाकारलेला हॉलिवूडपट; म्हणाले,"दहशतवाद्याची भूमिका करणार नाही"