Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
217 Padmini Dham : '217 पद्मिनी धाम'चा थरार रंगभूमीवर; रत्नाकर मतकरींच्या कथेवर आधारित नाटक
217 Padmini Dham New Marathi Drama : गूढकथा आणि रहस्य कथांच्या बाबतीत जेव्हा केव्हा बोललं जात तेव्हा रत्नाकर मतकरी (Ratnakar Matkari) हे नाव हमखास घेतलं जातं. आपल्या लिखाणाने एक रहस्यमयी आणि गूढ जगात या कथा वाचकांना घेऊन जातात. याच कथांच अनेकदा जिवंत कलाकृतीत रूपांतर झालं असून आता रत्नाकर मतकरी यांच्या 'कामगिरी' या कथेवर आधारित '217 पद्मिनी धाम' हे नाटक रंगभूमीवर येत आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Kiran Mane: "ॲंग्री यंग मॅन हा मनात, मेंदूत,रक्तात भिनला.."; बिग बींच्या वाढदिवसानिमित्त किरण मानेची खास पोस्ट
Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा आज 81 वा वाढदिवस आहे. अमिताभ बच्चन यांचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी देखील सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करुन बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Namrata Sambherao: घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीबाबत नम्रता संभेरावनं शेअर केली पोस्ट; म्हणाली, "सुखाचा प्रवास कसा होईल .."
Namrata Sambherao: महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao) ही सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करते. नुकतीच नम्रतानं घोडबंदर रोडवरील (Ghodbunder Road) वाहतूक कोंडीबाबत एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Aatmapamphlet Marathi Movie : सुबोध भावे ते सई ताम्हणकर; "आत्मपॅम्फ्लेट" चित्रपटाचं कलाकारांनी केलं तोंडभरुन कौतुक
Aatmapamphlet Marathi Movie : आत्मपॅम्फ्लेट (Aatmapamphlet) या मराठी चित्रपटाचं सध्या अनेक जण कौतुक करत आहेत. काही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आत्मपॅम्फ्लेट चित्रपटाचं कौतुक केलं आहे. काही मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन आत्मपॅम्फ्लेट या चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाचं तसेच या चित्रपटाच्या कथानकाचं कौतुक केलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Rohit Pawar : टोलवरुन प्रश्न विचारणाऱ्या मराठी अभिनेत्रीचे सोशल अकाऊंट्स टार्गेट, ट्रोल गँग वापरुन किती खालची पातळी गाठणार, रोहित पवार आक्रमक
Rohit Pawar On Tejaswini Pandit : मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) टोलवाढीविरोधात ट्वीट केलं त्यानंतर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. अभिनेत्रीने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा एक व्हिडीओ शेअर करत टोलचे पैसे कुणाच्या खिशात जातात? असा प्रश्न उपस्थित केला. पुढे अभिनेत्रीच्या अकाऊंटची ब्लू टिक हटवण्यात आली. त्यानंतर तिने पुन्हा एक खास पोस्ट शेअर करत याप्रकरणावर भाष्य केलं. आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीदेखील कुणाकुणाचा आवाज दाबणार असं म्हणत सत्ताधाऱ्यांना सवाल केला आहे.